शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेची माहिती आता मिळणार ‘एसएमएस’वर!

By admin | Updated: May 24, 2016 03:46 IST

जमिनींसह सदनिकांचे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यशासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग पुढे सरसावला आहे. खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून ते थेट मोबाईलशी

पुणे : जमिनींसह सदनिकांचे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यशासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग पुढे सरसावला आहे. खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून ते थेट मोबाईलशी जोडले आहे. त्यामुळे ज्या मालमत्तेची खरेदी-विक्री करणार त्याच्या कागदपत्रांवरील नोंदणी क्रमांक विभागाच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस केल्यास ती जमीन कोणाच्या नावावर आहे, त्या कागदपत्राची नोंद कधी झाली आहे, याची माहिती लगेचच संबंधिताला मिळणार आहे. यामुळे गैरव्यवहारांना आळा बसण्यास मोठी मदत होईल.राज्यात जमिनींसह सदनिकांच्या गैरव्यवहारात मोठी वाढ झाली आहे. मालमत्तेची खरेदी-विक्री करणारे दलाल अनेकदा बनावट कागदपत्रे दाखवितात. परंतु ते तपासण्याची सोपी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फटका खरेदीदारांना बसत होता. बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेऊन मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना पुढे ती मालमत्ता अनेकांना विकल्याचे निदर्शनास येते. मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. नोंदणी व मुद्रांक विभागाने जमिनी, सदनिकांच्या विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यास सुरूवात केली आणि ते सर्व्हरवर ठेवून विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन देण्यास सुरूवात केली. ‘ई सर्च’च्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या व्यक्तीला तो जी मालमत्ता घेणार आहे ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे त्या मालमत्तेचा नोंदणी क्रमांक टाकून समजू लागले. आता एसएमएसवर देखील माहिती दिली जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने या सेवेसाठी ९७६६८९९८९९ हा क्रमांक दिला आहे.वाढलेले मालमत्तेचे गैरव्यवहार रोखण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने एसएमएस सेवा सुरू केली आहे. विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्रे आहेत. मात्र आता त्याची माहिती एसएमएसवरुनही मिळणारआहे. खरेदीदाराने कागदपत्रांवरील नोंदणी क्रमांक विभागाने दिलेल्या (९७६६८९९८९९) क्रमांकावर एसएमएस केल्यावर त्यांना लगेचच ती मालमत्ता कोणाच्या नावे आहे हे कळणार आहे.- एन. रामास्वामी, महानिरीक्षक-नोंदणी व मुद्रांक विभाग