शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांनी घेतली ज्योतिषांकडे धाव

By admin | Updated: January 21, 2017 01:34 IST

महापालिका निवडणुकीमुळे ज्योतिषांकडे जाणारांची गर्दी वाढली आहे

पिंपरी : महापालिका निवडणुकीमुळे ज्योतिषांकडे जाणारांची गर्दी वाढली आहे. काही जणांनी ज्योतिष्यांना परगावाहून निमंत्रित केले आहे. त्यांच्याकडून इच्छुकांना वेगवेगळ््या प्रकारची शांती करण्यासाठी सांगण्यात येत आहे. तसेच शहर परिसरात भोंदूबाबांचे प्रस्थ वाढले असल्याचे दिसून येत आहे.निवडणूक आयोगाने पौष महिन्यातच निवडणुका जाहीर केल्या आहेत. हा महिना म्हणजे चांगल्या कामाचा प्रारंभ करण्यास अशुभ मानला जातो. त्यामुळे इच्छा असूनही काही इच्छुक प्रत्यक्ष प्रचार करीत नाहीत. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी प्रचाराबरोबर अंधश्रद्धाही पाळल्या जात आहेत. त्यासाठी ज्योतिषी आणि भोंदूबाबाना मागणी वाढली आहे. भोंदूबाबा सांगतील ते खरे असे समजून इच्छुक त्यांच्यासाठी वाटेल ते खर्च करत आहेत. या काळात इच्छुकांच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या गंड्यांसह बोटातील अंगठ्याही वाढल्या आहेत. कोणता भविष्यवाला व्यवस्थित माहिती सांगेल, याची चाचपणी केली जात आहे. विरोधक तगडा असल्यास काय करता येईल, काय निर्णय घ्यावा, याबाबतही माहिती घेतली जात आहे. देवदर्शनासह बाबांकडून जे सांगितले जाईल, त्या प्रकारच्या शांती व पूजा केल्या जात आहेत. प्रचारासाठी किती वाजता घराबाहेर पडायचे, अर्ज कोणत्या दिवशी भरायचा, उमेदवारी मिळण्यासाठी काय करायला हवे, या बाबी इच्छुक उमेदवार भविष्यवाल्याला विचारुन करीत आहे. यामुळे सध्या अनेक इच्छुक भविष्यवाल्याच्या दारात दिसत आहेत. महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक केली जात आहे. अनेक इच्छुक शहरापासून दूर अंतरावरील बाबांकडेही जात आहे. (प्रतिनिधी)>खड्याच्या अंगठीला मागणीजन्मपत्रिका सांगून इच्छुकांना ठराविक खड्यांची अंगठी घालण्यास सांगण्यात येत आहे. त्याच्या किंमत दहा हजारांपासून सुरू होत आहे. तरीही एका इच्छुकाच्या हातात पाच ते सहा अंगठ्या दिसत आहेत. काही भोंदूबाबा इच्छुकांना अमूक एका दिशेकडे पाय पसरून झोपा म्हणजे तुम्हाला फायदा होईल. त्यातून तुम्ही विजयी व्हाल, असे सांगत आहेत.मुहूर्तावर भरणार अर्जनिवडणुकीत कसलीही अडचण येऊ नये, निवडणूक प्रक्रियेतील वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज भरताना दिवस व वेळ कोणती असावी, प्रचाराला कोणत्या वेळेत जावे, आदींची माहिती घेतली जात आहे. भविष्य सांगणारयांकडे इच्छुकांचीच गर्दी दिसून येत आहे.