शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्ये- अशोक चव्हाण

By admin | Updated: May 10, 2017 19:49 IST

इतकी तूर खरेदी करूनही शेतक-यांचे रडगाणे सुरूच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात साले

ऑनलाइन लोकमतमुंबई दि. 10 - इतकी तूर खरेदी करूनही शेतक-यांचे रडगाणे सुरूच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात साले, असे वक्तव्य करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले असून, सत्तेची नशा दानवेंच्या डोक्यात गेल्याने दानवे शेतक-यांबाबत असंसदीय शब्द वापरून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.जालना येथे बोलताना शेतक-यांबाबत दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. राज्यातल्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील, अशी घोषणा सरकारने केली होती. पण त्यानंतर सरकारने तूर खरेदी केंद्र बंद करून राज्यातील शेतक-यांचा विश्वासघात केला. काँग्रेस पक्षाने याविरोधात आवाज उठवल्यानंतर तूर खरेदी सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण अद्यापही अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत. दरम्यानच्या काळात अवकाळी पावसाने तूर खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या अनेक शेतक-यांची तूर भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या शेतक-यांना नुकसानभरपाई देऊन त्यांची संपूर्ण तूर खरेदी करणे हे सरकारचे कर्तव्य असताना सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारी वक्तव्ये करीत आहेत. शेतक-यांबाबत असंसदीय शब्दांचा वापर करीत आहेत. यावरून या सरकारला शेतक-यांसंबंधी संवेदना नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.यापूर्वीही दानवे यांनी शेतक-यांना कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची लेखी हमी द्या असे वक्तव्य केले होते. राज्यातल्या साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी राज्य सरकार शेतक-यांना कर्जमाफी देत नाही. शेतक-यांना कर्जमाफी देऊन त्यांना संकटातून बाहेर काढण्याऐवजी सत्ताधारी भाजपाचे नेते शेतक-यांबाबत बेताल वक्तव्य करित आहेत. भाजपा नेत्यांची सत्तेची नशा चढल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. पण राज्यातले शेतकरी भाजपा नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.