शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कापूस बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा!

By admin | Updated: July 1, 2014 00:51 IST

विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता,

शेतकऱ्यांची वणवण : कृषी विभागाचे मौन नागपूर : विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता, यंदा अनेकांनी कापूस लागवडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात अचानक कापूस बियाण्याची मागणी वाढली आहे. परंतु काही दुकानदार या संधीचा गैरफायदा घेऊन अधिक मागणी असलेल्या कापूस बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.माहिती सूत्रानुसार सध्या बाजारात अजित-१५५ व अजित-१९९ या वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु गत काही दिवसांपासून या दोन्ही वाणांचा संपूर्ण जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मते, काही दुकानदार अजित-१५५ किंवा अजित-१९९ हवे असल्यास, त्यासोबत इतर बियाणे घेण्याची अट घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत असून, त्यांना दुकानदारांच्या साठेबाजीला बळी पडावे लागत आहे. वास्तविक कृषी विभागाने यापूर्वीच ‘मागेल त्याला मुबलक बियाणे’ मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या बाजारात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे.त्यापैकी कृषी विभागाने यंदा सोयाबीनसाठी २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर, कापसासाठी १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमुग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)