शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभागृहातील गैरवर्तणुकीला बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2016 21:28 IST

नागरी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आपल्या वक्तृत्वापेक्षा ताकदीचा वापर नगरसेवक करु लागले आहेत़

 शेफाली परब/ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - नागरी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आपल्या वक्तृत्वापेक्षा ताकदीचा वापर नगरसेवक करु लागले आहेत़ त्यामुळे शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर आता हाणामारीच्या प्रसंगामध्ये होऊ लागले आहे. याची गंभीर दखल घेत या ऐतिहासिक सभागृहाचा मान राखण्यासाठी नगरसेवकांना आचारसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव खुद्द आयुक्त अजोय मेहता यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांपुढे ठेवला आहे. त्यानुसार बेशिस्त नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढणे तर वेळ पडल्यास त्यांचे पद रद्द करण्याची शिफारसच त्यांनी केली आहे.जनतेचा आवाज पालिका प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदार नगरसेवकाची असते़ पालिका महासभेच्या माध्यमातून नगरसेवकांना नागरी समस्यांवर प्रशासनाला जाब विचारता येत असतो़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिका महासभेतील चर्चेचा स्तर खालावला आहे़ नगरसेवकांमध्ये हाणामारीचे प्रसंग वारंवार घडू लागले आहेत़ देवनार कचरा समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी व्यासपीठावर महापौर व आयुक्तांच्या दिशेने कचरा भिरकवला़ हा प्रसंग सभागृहात बसलेल्या अन्य सदस्यांसाठी नित्यनेहमाचा असेल़ मात्र आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्धार केला आहे. बेशिस्त व गैरवर्तणूक करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर काढण्याचे अधिकार महापौरांना असतात़ मात्र नगरसेवक या कारवाईला जुमानत नसल्याने महापौरांचा अवमान होत आहे. त्यामुळे पालिका सभागृहातही शिस्तीचे पालन होण्यासाठी आचारसंहितेचा मसुदाही आयुक्तांनी तयार केला आहे.

अशी असेल आचारसंहिता निलंबित केल्यानंतरही सदस्य सभागृहाच्या बाहेर जात नसल्यास पीठासीन अधिकारी मार्शल्सची मदत घेऊन नगरसेवकाला बाहेर काढू शकतात. बेशिस्त ठरलेल्या नगरसेवकाला इतर समित्यांच्या कामकाजातही भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात यावा. प्रतिस्पर्धी बाकावरील नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळू नये यासाठी बऱ्याचवेळा नगरसेवक सभागृहात शिटी आणून वाजवितात़ तर काहीवेळा कचरा आणणे, दूषित पाण्याची बाटली आणणे असे प्रकार घडतात़ सभागृहात अशा कोणत्याही वस्तू आणण्यास बंदी घालण्यात यावी़ तसेच नगरसेवकांच्या तपासणीची प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाला परवानगी द्यावी़. सभागृहात खणखणणारे मोबाईलचे आवाज बंद करण्यासाठी जॅमर बसविण्यात यावे़ तसेच अशोभनिय वर्तणुकीबद्दल संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा ठराव पालिका महासभेत मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा. सभागृहाची गरिमा राखणे व पीठासीन अधिकाऱ्याचा आदर करणार असे शपथपत्रच नगरसेवकांकडून घेणे, हा मसुदा सर्वपक्षीय गटनेत्यांच्या येत्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. यास मंजुरी मिळाल्यानंतर हा मसुदा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.