शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

करीमलालाच्या भाच्याला एमडी विक्रीमुळे अटक

By admin | Updated: January 12, 2015 03:22 IST

एकेकाळी सोनेतस्करीत कुप्रसिद्ध असलेल्या करीमलालाचा भाचा मोहंमद जफर हैदर खान (४१, रा. कौसा मार्केट) याला मेफे ड्रॉन अर्थात ‘एमडी’ची विक्री करताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक

ठाणे : एकेकाळी सोनेतस्करीत कुप्रसिद्ध असलेल्या करीमलालाचा भाचा मोहंमद जफर हैदर खान (४१, रा. कौसा मार्केट) याला मेफे ड्रॉन अर्थात ‘एमडी’ची विक्री करताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. १२ हजार ५०० रुपयांच्या २५ ग्रॅम एमडी पावडरसह चाकूही हस्तगत करण्यात आला आहे.कौसा मार्केट परिसरात जफर एमडी पावडरची विक्री करीत असल्याची ‘टीप’ अंमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.बी. धर्माधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने जफरला कौसा मार्केट परिसरातून ९ जानेवारीला ताब्यात घेतले. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या जफरला या पावडरच्या सेवनाचे व्यसन आहे. व्यसन पूर्ण करण्यासाठी तो याच पावडरची ४०० ते ५०० रुपये ग्रॅमने विक्रीही करीत होता. १९७० ते ८०च्या दशकात सोनेतस्करीत कुप्रसिद्ध असलेला करीमलाला याचा तो भाचा आहे. ही पावडर तो कोणाकडून आणत होता, त्याचे आणखी साथीदार कोण आहेत, याचाही तपास करण्यात येत असल्याचे धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)