शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आरडीएक्स उतरविणारा आरोपी जेरबंद

By admin | Updated: August 21, 2015 00:59 IST

१९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी गोसबारा येथे शक्तिशाली आरडीएक्स स्फोटके आणि इतर शस्त्रास्त्रांची खेप उतरविण्यात सहभागी असलेल्या आरोपीला

अहमदाबाद : १९९३ मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी गोसबारा येथे शक्तिशाली आरडीएक्स स्फोटके आणि इतर शस्त्रास्त्रांची खेप उतरविण्यात सहभागी असलेल्या आरोपीला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाला यश आले. एटीएसने त्याला उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून अटक केली.मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने इश्तियाक अहमद अन्सारी (४६) याला त्याच्या किर्तपूर (उत्तर प्रदेश) गावातून मंगळवारी अटक केली. बुधवारी त्याला अहमदाबादेत आणण्यात आले. १९९३ मधील मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्राधारांपैकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम एक आहे. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी दाऊदने पाकिस्तानमधील कराचीतून समुद्रमार्गे गुजरातमध्ये आरडीएक्स, एके-४७ रायफलीसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविली होती. १९९३ मध्ये जामनगर ‘बी’ विभाग पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनुसार आरडीएक्स आणि इतर शस्त्रास्त्रे गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्णातील गोसबारा किनारपट्टीवर उतरविण्यात आली होती. तेथून ही स्फोटके आणि शस्त्रास्त्रे दाऊदशी संबंधित लोक आणि इतर कटकारस्थानी लोकांपर्यंत पोहोचती करण्यात आली होती.त्यावेळी धाडीत पोलिसांना ५ एके-४७ रायफली, एक एके-५६ रायफल, ४३ हातबॉम्ब, ३,०११ काडतुसे सापडली होती. ही स्फोटके आणि शस्त्रे पोरबंदर जिल्ह्णात उतरविण्यात आलेली असली तरी एफआयआर जामनगरमध्ये नोंदविण्यात आला होता.