शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचा पारा उतरला

By admin | Updated: November 1, 2014 02:08 IST

शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही, या भाजपा नेत्यांच्या विधानामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता.

शहांचा फोन गेला : उद्धव ठाकरे सोहळ्याला हजर
मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही, या भाजपा नेत्यांच्या विधानामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने  सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता. मात्र केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केलेली शिष्टाई व तुमच्या अनुपस्थितीचा अर्थ शिवसेनेला सरकारमध्ये सामील होण्यात रस नाही असा घेतला जाईल, असा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी  दिलेल्या इशा:यामुळे अखेर उद्धव ठाकरे उशिरा का होईना शपथविधी सोहळ्य़ाला हजर झाले.
भाजपाचे नेते राजीव प्रतार रुडी यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार नाहीत, असे जाहीर मत व्यक्त केले. गेले काही दिवस शिवसेनेच्या मंत्रिपदाबाबतच्या मागण्या, खात्यांचा आग्रह याबाबत उलटसुटल बातम्या प्रसिद्ध होत होत्या. याखेरीज भाजपाला शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात रस नाही, असाही सूर काही नेत्यांच्या हवाल्याने प्रसिद्धी माध्यमांतून लावला जात होता. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांतील नाराजी बळावली होती. त्यामुळे शिवसेनेने शपथविधी सोहळ्य़ाला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून शपथविधी सोहळ्य़ाला हजर राहण्याची विनंती केली. दोन व्हीव्हीआयपी पासेस सकाळी मातोश्रीवर पोहोचवण्यात आले होते. त्यानंतर अमित शहा यांनीही ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. शिवसेनेने शपथविधी सोहळ्य़ाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा अर्थ शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी होण्यात रस नाही, असाच घेतला जाईल. दीर्घकाळानंतर सत्ता आल्याने मंत्रिपदांकरिता भाजपामधून मोठी मागणी आहे. या खेरीज मित्रपक्षांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे बहिष्कारानंतर शिवसेनेच्या सरकारमधील प्रवेशाचे समर्थन  करताना आमची अडचण होईल, असे शहा यांनी उद्धव यांच्या कानावर घातले.
 
कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 
यांनी उद्धव यांच्याशी फारसा संवाद साधला नाही. मात्र अमित शहा यांनी 
उद्धव यांचे उपस्थितीबद्दल आभार मानले 
व चर्चेची कोंडी फुटली.