शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपा हमरीतुमरीवर

By admin | Updated: June 17, 2016 06:06 IST

महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना व भाजपाच्या मैत्रीमधील दरी रुंदावत चालली असून आता ते हमरीतुमरीवर उतरल्याचे चित्र आहे. रस्ते घोटाळा प्रकरणात

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना व भाजपाच्या मैत्रीमधील दरी रुंदावत चालली असून आता ते हमरीतुमरीवर उतरल्याचे चित्र आहे. रस्ते घोटाळा प्रकरणात लेखा विभागातील खासगी संस्थेच्या दहा अधिकाऱ्यांना बुधवारी मध्यरात्री अटक झाल्यानंतर आता कंत्राटदारांना पाठीशी घालणारे व ‘करून दाखविले’ म्हणणारेही आत जातील, असा हल्ला चढवत भाजपाने शिवसेनेच्या वर्मावरच वार केला. यामुळे संतापलेल्या शिवसेनेनेही आधी भाजपाने दानवे, खडसे, महाजन यांची प्रकरणे बघावीत, असा प्रतिहल्ला चढवत भाजपाच्या स्थानिक नेत्यांची डरपोक या शब्दांत संभावना केली. मुंबईतील ३४ रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता आढळून आली आहे़ सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे़ त्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी बुधवारी रात्री संतोष तुळशीराम कदम (४२), अहफाक मन्सुरअली सय्यद (२६), मिलिंद तेजमल कुमावत (२६), राकेश शंकर मेरवाडे (३४), पवनकुमार ओमप्रकाश शुक्ला (२६), प्रेमाचंद शिवाजी धनवडे (३७), मंगेश हरीभाऊ तळेकर (३३), शिरज देवरावजी फुलझेले (४०), राहुल शिंदे (२९), धैर्यशिल हिंदुराब पाटील (३३) या खासगी संस्थेच्या १० लेखा परीक्षकांना अटक केली. आता यापुढची कारवाई पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर होण्याची शक्यता आहे. या अटकेनंतर अ‍ॅड़ आशीष शेलार यांनी सोशल मीडियाद्वारे शिवसेनेवर हल्ला चढविला. शिवसेनेनेही त्यास तात्काळ प्रत्युत्तर देत, त्यांनी आधी आपल्या नेत्यांची प्रकरणे बघावीत़, असा टोला लगावला. त्यामुळे आता दोन्ही पक्ष हमरीतुमरीवर उतरल्याचे दिसते. (प्रतिनिधी)भाजपाचा हल्लाहा घोटाळा उघड करण्यासाठी भाजपानेच पहिल्यापासून पाठपुरावा केला, असा दावा करीत अ‍ॅड़ शेलार यांनी या चौकशीचे श्रेय भाजपाच्या खिशात घातले आहे़ तसेच ठेकेदारांना पाठीशी घालणारे व ‘करून दाखविले’ म्हणणारे आत जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.शिवसेनेचा प्रतिहल्लाशेलार भविष्य पाहायला लागले आहेत का, पण शिवसेना कधी भविष्यात रमत नाही, वर्तमानात रमते़ दानवे, महाजन, खडसे यांची प्रकरणे भाजपाने बघावीत़ ‘करून दाखविले’ असे म्हणणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास शेलार यांना भरपूर अवधी आहे, असे आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे़ तर नाव न घेता शिवसेनेवर टीका करणारे शेलार हे डरपोक आहेत, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.