शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील खड्ड्यांचे बळी दिसत नाहीत का?

By admin | Updated: February 14, 2017 03:57 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, खड्ड्यांमुळे बळी पडणाऱ्या मुंबईकरांना पाहून तुमच्या हृदयावर कसला परिणाम झाल्याचे कधी जाणवले नाही. मग तुमच्या या असल्या हृदयांना काय म्हणायचे, असा पलटवार भाजपाने केला आहे.नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. जाहीर सभांमधून दोन्ही नेते एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. नोटाबंदीमुळे भ्रष्ट नेत्यांची अडचण झाली मग तुम्हाला का त्रास झाला, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर, नोटाबंदीमुळे दोनशेहून अधिक माणसे हकनाक दगावली. लादलेल्या निर्णयामुळे दोनशे नागरिक दगावले त्याच्या वेदना झाल्या. त्या वेदनांकडे डोळेझाक करून मोदींचा उदो उदो तुम्ही करताय तितका पाषाणहृदयी मी नाही, असे चोख प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी खड्ड्यातले बळी दिसत नाहीत का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला. मुंबईप्रमाणेच शांघायची स्थिती आहे. मात्र, तेथील कचरा, सांडपाणी व्यवस्थापन उत्तम मानले जाते. चीनचे राष्ट्राध्यक्ष झी चिनपिंग भारत दौऱ्यावर असता मुंबई-शांघाय भगिनी शहरे बनविण्याचा करार झाला होता. मात्र, सेनेने सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत पावले उचलली नाहीत. याबाबत पालिका प्रतिसाद देत नसल्याचे शांघायच्या महापौरांनी म्हटल्याचे भांडारी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)