शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘दादां’च्या बुरुजावर ‘बाबां’चा सुरुंग

By admin | Updated: October 11, 2014 05:36 IST

सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आठपैकी सहा आमदार याच पक्षाचे. या टापूत आजपर्यंत दिसायची केवळ अजितदादांचीच छावणी

सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आठपैकी सहा आमदार याच पक्षाचे. या टापूत आजपर्यंत दिसायची केवळ अजितदादांचीच छावणी; परंतु यंदाच्या निवडणुकीत पृथ्वीराजबाबांच्या ‘टीम’नं लावलाय सुरुंग. धडाडू लागल्यात ‘कमळाबाई’च्याही तोफा. थोडक्यात, ‘राष्ट्रवादी’ बुलंद बुरुजांना बसू लागलेत चांगलेच हादरे .राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची प्रचंड वर्दळ वाढलीय. पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात अन् सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सभांवर सभा घेताहेत. दुसरीकडे भाजपचे अतुल भोसले यांच्यासाठीही अनेक नेते वातावरण ढवळून काढताहेत. अपक्ष उमेदवार विलासराव पाटील-उंडाळकर मात्र, अद्याप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत प्रचार करताहेत. राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र अजिंक्य पाटील यांची शिवसेनेची उमेदवारीही चर्चेचा विषय ठरलीय.शेजारच्या पाटणमध्ये आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी स्वत:ऐवजी सुपुत्राला निवडणूक रिंगणात उतरविलंय. त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी शंभूराज देसाई यांनी शिवसेनेकडून शड्डू ठोकला असला तरी काँग्रेसचे हिंदुराव पाटील यांचीच मते मतदारसंघात निर्णायक.वाई-खंडाळा-महाबळेश्वरमध्ये मात्र, चार जणांमध्ये ‘काँटे की टक्कर’. विद्यमान आमदार मकरंद पाटील अन् माजी आमदार मदन भोसले यांच्यातला नेहमीचा सामना रंगलेला. परंतु, यंदा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव ‘भाजप’कडून तर महाबळेश्वर मधील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर शिवसेनेकडून मैदानात उतरलेत. फलटण तालुक्यात आजपावेतो रामराजे नाईक-निंबाळकरांचंच अबाधित वर्चस्व. मात्र, लोकसभेला ‘स्वाभिमानी’च्या सदाभाऊ खोतांनी राजे गटाची शिट्टी वाजवली. तेव्हापासून चवताळून उठलेल्या रामराजेंनी आक्रमक प्रचाराचा धुमधडाका लावलाय. शिवसेनेचे नंदकुमार तासगावकर यांनीही ‘राजेंची कठपुतली’ म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लाबोल चढविलाय. ‘स्वाभिमानी’त गेलेल्या दिगंबर आगवणेंनी पुन्हा शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केल्यानं विरोधकांनी त्यांच्या ‘फटफजिती’चं वातावरण लोकांसमोर उभं केलंय.