शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महाधिवक्त्यांची नियुक्ती ३० डिसेंबरपर्यंत, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 05:32 IST

येत्या ३० डिसेंबरपर्यंत महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे उच्च न्यायालयापुढे स्पष्ट करत राज्य सरकारने या पदाच्या

मुंबई : येत्या ३० डिसेंबरपर्यंत महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे उच्च न्यायालयापुढे स्पष्ट करत राज्य सरकारने या पदाच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाला शुक्रवारी पूर्णविराम दिला. ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी मार्चमध्ये राजीनामा दिल्यानंतर महाधिवक्ता पद रिक्तच ठेवण्यात आले. यादरम्यान राज्य सरकारचा कारभार सांभाळण्यासाठी अ‍ॅड. रोहित देव यांची नियुक्ती ‘हंगामी महाधिवक्ता’ म्हणून करण्यात आली. मात्र महाधिवक्ता पद हे घटनात्मक असल्याने या पदावर नियुक्ती करण्यात आल्याशिवाय सरकार अपूर्ण असते. त्यामुळे महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.या याचिकेच्या सुनावणीत हंगामी महाधिवक्ता रोहित देव यांनी ३० डिसेंबरपर्यंत महाधिवक्त्याची नियुक्ती होईल, अशी माहिती खंडपीठाला दिली. महाधिवक्त्याच्या नियुक्तीला विलंब होत असल्याने गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले होते. तसेच महाधिवक्त्याच्या नियुक्तीबाबत निश्चित तारीख द्या, असे सरकारला सांगितले होते.भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नागपूरचे ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र गोवंश मांसबंदीच्या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनोहर यांनी स्वत:हून राजीनामा दिला. त्यानंतरही कित्येक महिने महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. महाधिवक्त्यांच्या नियुक्तीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सरकारने ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी वर्णी लागली.मात्र अ‍ॅड. अणे स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करत असल्याने त्यांनीही मार्चमध्ये राजीनामा दिला. त्यानंतर आठ महिने हे पद रिक्तच राहिले. (प्रतिनिधी)