शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता विक्रीसाठी प्राधिकारी नियुक्त

By admin | Updated: October 16, 2016 00:27 IST

मैत्रेय कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ४७ कोटींची मालमत्ता उघड केली. या संपत्तीची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास

अमरावती : मैत्रेय कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ४७ कोटींची मालमत्ता उघड केली. या संपत्तीची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले असून त्या आदेशाचे पत्र आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाले आहे. अधिक पैशांचे प्रलोभन दाखवून ‘मैत्रेय’ कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. चौकशीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची ४७ कोटींची मालमत्ता उघड केली. सात बँक खात्यांतील ३७ लाखांची रक्कम सील केली. ४७ कोटींच्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करावा, असे प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले. मैत्रेयच्या अमरावती शहरातील मालमत्तेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून इतर जिल्ह्यातील जप्त मालमत्तेबाबत त्या जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)मैत्रेय कंपनीच्या ४७ कोटींच्या मालमत्तेसंदर्भात सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे तसे आदेश प्राप्त झाले असून पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण करू. - गणेश अणे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती