शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत नवीन वाळू धोरण लागू

By admin | Updated: April 11, 2015 00:06 IST

राज्यातील अवैध वाळू उत्खननाला चाप लावण्यासाठी येत्या दोन महिन्यात वाळू धोरण जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.

मुंबई : राज्यातील अवैध वाळू उत्खननाला चाप लावण्यासाठी येत्या दोन महिन्यात वाळू धोरण जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. श्रीगोंदा व मोहोळ या तालुक्यात भिमा व सीना नदीतून वाळुची तस्करी होत असल्याबाबतचा मुद्दा समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री खडसे म्हणाले की, अवैध वाळू तस्करी रोखतानाच वाळू उत्खननासंबंधी प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राज्य शासनाने वाळू धोरण तयार केले असून अभिप्रायासाठी तो हरित लवादाकडे सादर करण्यात आला आहे. नव्या वाळू धोरणात महसूल, गृह आणि पर्यावरण आदी विभागांची समन्वय समिती तयार करणे, नदी पात्रांचे डिजिटल मॅपिंग, नदीपात्रातील उत्खननाबाबत नियमावलींचा समावेश करण्यात आला आहे. हरित लवादाकडून याबाबत अभिप्राय येताच दोन महिन्याच आत नवीन वाळू धोरण लागू करण्यात येईल, असे खडसे म्हणाले. शिवाय, वाळू माफियांना रोखताना जप्त करण्यात आलेले साहित्य नष्ट करण्याची सूचना अधिका-यांना देण्यात आल्या. मात्र, यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याने नवीन कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. वाळू माफियांवर दरोडा आणि एमपीडीए अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदविण्याचा यात अंतर्भाव असेल. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात तसे विधेयक मांडणे शक्य झाले नसले तरी लवकरच याबाबत वडहुकूम जारी करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले. आता पर्यंत राज्यभरात २८ हजार ३०९ वाळू तस्करीच्या घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी ४३ कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून ३७ कोटींची वसूली करण्यात आली. तर, ११९९ गुन्ह्णात १०५९ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)