शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅपल’चे टिम कूक सिद्धिविनायकाच्या चरणी!

By admin | Updated: May 19, 2016 05:53 IST

सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी सकाळी तीन-चार आलिशान गाड्यांचा ताफा आला आणि त्यातून चक्क अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम उतरले.

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी सकाळी तीन-चार आलिशान गाड्यांचा ताफा आला आणि त्यातून चक्क अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम उतरले. खरे तर सिद्धिविनायकाच्या मंदिरात परदेशी नागरिकांचे येणे नवीन नाही. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश हेही त्यांच्यासोबत दिसले तेव्हा कुणीतरी व्हीव्हीआयपी आल्याची जाणीव सर्वांना झाली. आकाश यांच्यासोबत असलेली व्यक्ती ही ‘अ‍ॅपल’ कंपनीची सीईओ टिम कूक आहे, ही घटना मुंबईत ‘टॉक आॅफ द टाऊन’ झाली. मंगळवारी रात्री चीनहून खासगी विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर ताजमहाल हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी गेलेल्या कूक यांच्यासाठी ‘ग्रँड लक्झरी सूट’ सज्ज होता. बुधवारी प्रमुख कंपन्यांच्या सीईओसोबत ब्रेकफास्ट करत असतानाच आकाश अंबानी ताजमध्ये आले आणि मग कूक यांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचले. दिवसभर व्होडाफोन कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांपासून सायरस मिस्त्री आणि अनेक मोठ्या उद्योगपतींना भेटल्यानंतर रात्री उशिरा टिम कूक हे विख्यात अभिनेते शाहरूख खान यांच्या ‘मन्नत’ बंगल्यावर खास निमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीत उपस्थित राहिले. कूक गुरगाव, दिल्ली आणि हैदराबाद येथे भेट देणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)बंगलोरमध्ये अ‍ॅपलचे अ‍ॅप निर्मिती केंद्रकंपनीच्या ‘आयओएस’ या आॅपरेटिंग सिस्टीमवर चालतील अशा विविध लोकोपयोगी अ‍ॅपच्या निर्मितीसाठी कंपनीने बंगलोर येथे अ‍ॅप विकास केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे. >भेटीचे महत्त्व काय आहे ?अ‍ॅपलला भारतात त्यांचे ‘सेकंड हँड’ फोन विकण्याची अनुमती हवी आहे. केंद्राने कंपनीचा हा प्रस्ताव फेटाळला. मात्र सेकंड हँड फोन भारत मोठे मार्केट असल्याने तसा प्रयत्न ते पंतप्रधानांच्या भेटीत करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलला स्वत:ची दुकाने आणि आॅनलाइन विक्री भारतात करायची आहे.भारतात सेवा देण्यासाठी वितरण व सेवा-सुविधा नेटवर्क उभारायचे आहे.अ‍ॅपलच्या फोनची निर्मिती करणाऱ्या फोक्सकॉनमार्फत ‘मेक इन इंडिया’अंतर्गत अंदाजे पाच अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीचा कंपनीचा विचार आहे.