शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसिंग’ नगरसेवकाला घरी येण्याचे आवाहन

By admin | Updated: January 15, 2017 05:50 IST

‘गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही घरी आलाच नाहीत. तुमच्या नसण्यामुळे एक प्रकारची अवकळा आली आहे. कृपया परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.’ अशी आर्जवे एक आई

पुणे : ‘गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही घरी आलाच नाहीत. तुमच्या नसण्यामुळे एक प्रकारची अवकळा आली आहे. कृपया परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.’ अशी आर्जवे एक आई आपल्या लेकराला करीत आहे. या अज्ञात आईने थेट स्वत:च्या हरवलेल्या चिरंजीव ‘नगरसेवका’च्या मिसिंगचे फलकच शहराच्या मध्यवस्तीत लावून ‘माया’ व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर आता राजकीय जुगलबंदीला सुरुवात झाली आहे. नारायण पेठ आणि त्या आसपासच्या भागातील रस्त्यारस्त्यांवर ‘नगरसेवक हरवला आहे’ असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक महापालिकेने तत्परता दाखवत हटवण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु कुठले कुठले फलक हटवायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. नारायण पेठ, रमणबाग चौक, मेहुणपुरा, केसरी वाड्याजवळ, पूना बेकरी, तांबडी जोगेश्वरी आदी भागामध्ये आणि प्रामुख्याने जुना प्रभाग क्रमांक ३७च्या हद्दीमध्ये हे फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकावर ‘चि. नगरसेवक हरवला आहे. तु गेल्यापासून प्रभाग आजारी आहे. तरी लवकर ये, तुझीच मतदार आई.’ आणि ‘नगरसेवक हरवले आहेत. जेथे असाल तेथून लवकर निघून या. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’ अशी वाक्ये छापण्यात आलेली आहेत. एकंदर निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. नोटाबंदीच्या काळात उपहासात्मक फलक शहरभर लावण्यात आले होते. त्याच पद्धतीचा आता या रणधुमाळीमध्ये उपयोग करून घेतला जात असल्याचे दिसत आहे. आता मिसिंग नगरसेवक डेरेदाखल होतात, की भलतेच मूल मतदारआई दत्तक घेते हे आगामी काळात स्पष्ट होईलच. (प्रतिनिधी)