शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महिला अधिकाऱ्याच्या छळामुळे एपीआयचा राजीनामा?

By admin | Updated: August 26, 2016 04:27 IST

मुंबईतून स्वत:हून नक्षलग्रस्त भागात बदली करून घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस खात्याला कायमचा रामराम ठोकला आहे.

जमीर काझी,

मुंबई- वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडून होणारा मानसिक त्रास आणि निलंबनाच्या कारवाईमुळे मुंबईतून स्वत:हून नक्षलग्रस्त भागात बदली करून घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस खात्याला कायमचा रामराम ठोकला आहे. आपल्या निलंबनाची चौकशी पूर्ण करून त्वरित राजीनामा मंजूर करा, असे साकडे त्याने पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना घातले आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहसचिव के. पी. बक्षी यांनाही पाठविली आहे.सहायक पोलीस निरीक्षक जगदीश काटे यांनी गोंदियातील आमगावच्या उपअधीक्षक दीपाली खन्ना यांच्या छळाला कंटाळून खात्यात काम करण्याची इच्छा नसल्याचे पत्र महासंचालकांना १७ आॅगस्ट रोजी पाठविले आहे. त्याची प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली. आमगाव पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना, महिलेने परपुरुषाशी विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दिली होती. मात्र असे असतानाही दीपाली खन्ना यांनी त्या प्रकरणात बलात्काराची केस दाखल करण्यास काटे यांनी टाळाटाळ केल्याचा पूर्वग्रहदूषित अहवाल अधीक्षकांना पाठवला आणि त्यामुळे आपले निलंबन झाल्याचा दावा काटे यांनी या निवेदनात केला आहे.>एपीआय काटे यांचे निलंबन केल्यानंतर त्यांनी दबाव आणण्यासाठी राजीनामा सादर केला आहे. प्राथमिक चौकशीत ते दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. विभागीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.- डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलीस अधीक्षक, गोंदिया>काटे यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून, आपला वैयक्तिक राग नाही. गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास हलगर्जीपणा केला, त्याचप्रमाणे त्याबाबत खुलासाही दिला नाही. माझ्याबाबत ‘आरटीआय’तून माहिती जमा करीत दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करीत आहे.- दीपाली खन्ना, उपअधीक्षक, आमगाव, गोंदिया