शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅन्टिलिया’च्या व्यवहाराची न्यायप्रविष्ठ म्हणून बोळवण!

By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानिया यांच्या मुंबईतील अन्टीलिया या निवासी इमारतीची जमीन वक्फची होती. करिमभाई इब्राहिमभाई

मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानिया यांच्या मुंबईतील अन्टीलिया या निवासी इमारतीची जमीन वक्फची होती. करिमभाई इब्राहिमभाई अनाथालयाची ही जमीन अ‍ॅन्टिलिया कमर्शियल प्रा.लि.या कंपनीला विकण्यात आली. या बेकायदेशीर व्यवहारास वक्फ मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष एम.ए.अजीज (आता मृत), तत्कालिन सीईओ एम.वाय.पटेल आणि एस.एस.अली कादरी जबाबदार असल्याचे आयोगाने म्हटले होते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे वक्फ बोर्डाला निर्देश देण्यात यावेत एवढेच कृती अहवालात म्हटले आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनींमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या ए.टी.ए.के.शेख समितीच्या अहवालावरील कृती अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. वक्फ जमिनींची गेली काही वर्षे कशी लूट करण्यात आली याची धक्कादायक माहिती शेख समितीने दिली. त्यावरमुळे कृती अहवालात शासनाने काही आजी-माजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यात बऱ्याच प्रकरणांमध्ये वक्फ बोर्डाचे तत्कालिन सीईओ एम.वाय.पटेल यांचा समावेश आहे. ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत. शेख समितीच्या अहवालात नमूद केलेली घोटाळ्यांची बहुतेक प्रकरणे ही मराठवाड्यातील आहेत. औरंगाबादेत बेकायदेशीर व्यवहारऔरंगाबाद येथील रेल्वे स्टेशननजीक असलेल्या शाह शैकतमिया दर्ग्याची ३ एकर ३ गुंठे जमीन सुफा शिक्षण संस्थेला वक्फ मंडळाच्या दोन तृतियांश सदस्यांच्या अनुमतीशिवाय २००६ मध्ये देण्यात आली. या बेकायदेशीर व्यवहारासाठी वक्फ बोर्डाचे तत्कालिन सीईओ एम.वाय.पटेल व अध्यक्ष डॉ. एम. ए. अजीज यांना जबाबदार धरण्यात आले आहे. पटेल यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)