शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थ्यांना पुरविल्या उत्तरपत्रिका

By admin | Updated: June 30, 2016 01:32 IST

फर्ग्युसन महाविद्यालयातील शिपाई योगेश आनंद शिगवण याने बी़. एस्सी.च्या ६ विद्यार्थ्यांना एकूण १३ उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्याचे तपासात उघड झाले

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील शिपाई योगेश आनंद शिगवण याने बी़. एस्सी.च्या ६ विद्यार्थ्यांना एकूण १३ उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्याचे तपासात उघड झाले आहे़ डेक्कन पोलिसांनी योगश शिगवण याला बुधवारी सकाळी अटक केली़ बी़ एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) ची परीक्षा एप्रिल २०१६ मध्ये झाली होती़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मूल्यमापनासाठी या उत्तरपत्रिका फर्ग्युसन महाविद्यालयाकडे आल्या होत्या़ या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यांमधील १३ उत्तरपत्रिका शिगवण याने बाहेर काढल्या व त्या परदेशी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्या होत्या़ या विद्यार्थ्यांनी लिहून परत दिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा गठ्ठ्यात ठेवताना शिगवण याच्याकडून गफलत झाली़ त्यामुळे त्या तपासल्या गेल्या नाहीत व या विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवर अनुपस्थित असा शेरा आला़ प्रत्यक्ष परीक्षेला हजर असताना त्यांच्या मार्कलिस्टवर अनुपस्थित असा शेरा कसा मारला गेला, याविषयी नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली़ तेव्हा या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, पण उत्तरपत्रिका गायब झाल्याचे निष्पन्न झाले़ पोलिसांनी त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले़ ज्या विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिका पुरविल्या, त्यांचा शोध घ्यायचा आहे़ त्याचा कोणी साथीदार आहे का, यापूर्वी त्याने असा काही प्रकार केला आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने ती ग्राह्य धरून २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांनी चौकशी केल्यावर त्यात योगेश शिगवण याने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर मंगळवारी रात्री डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ शिगवण याने याची कबुली दिली असून ज्यांना या उत्तरपत्रिका घरी लिहिण्यासाठी दिल्या, ते सर्व परदेशी विद्यार्थी असून पुनर्परीक्षार्थी आहेत़ या ६ विद्यार्थ्यांपैकी काहींचे एक, तर काहींचे दोन विषय राहिलेले होते़ त्याने प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी ३ हजार रुपये घेत असल्याचे सांगितले़