शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

अन्सल बंधूंचा तुरुंगवास टळला; 60 कोटींचा दंड

By admin | Updated: August 20, 2015 01:24 IST

उपहार चित्रपटगृह अग्निकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना मोठा दिलासा देत उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी

नवी दिल्ली : उपहार चित्रपटगृह अग्निकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना मोठा दिलासा देत उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्याची मागणी फेटाळून लावली. पण अन्सल बंधूंना तीन महिन्यांच्या आत प्रत्येकी 3क् कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही दिले.13 जून 1997 रोजी ह्यबॉर्डरह्ण या चित्रपटाचा खेळ चालू असताना दक्षिण दिल्लीतील ग्रीनपार्कस्थित उपहार चित्रपटगृहात आग लागली होती. बाल्कनीत अडकलेल्या 59 प्रेक्षकांचा गुदमरून मृत्यू झाला होता, तर चेंगचेंगरीत शंभराहून अधिक प्रेक्षक जखमी झाले होते.अन्सल बंधूंनी एव्हाना भोगलेल्या तुरुंगवासाच्या कालवधीर्पयतच त्यांची कारावासाची शिक्षा मर्यादित करून न्या. ए.आर. दवे, कुरियन जोसेफ आणि आदर्श कुमार गोयल यांच्या न्यायपीठाने दोन्ही भावांना जबर दंड भरण्याचा आदेश दिला. दिल्ली सरकार ही रक्कम कल्याणकारी योजनांवर खर्च करील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. तब्बल 23 लहान मुलांसह 59 जणांचा जीव अन्सल बंधूंच्या निष्काळजीपणामुळे गेला, आणि या दोघांनी सुनावण्यात आलेली शिक्षाही पुरती भोगलेली नाही. दोन वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आल्यावरही सुशीलने पाच महिने व गोपालने केवळ 142 दिवस तुरुंगात काढले. त्यामुळे अन्सल बंधूंना उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविण्याची विनंती सीबीआयच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केली; परंतु न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली. उपहार दुर्घटना पीडित संघटनेच्या वतीने के.टी.एस. तुलसी यांनी तर अन्सल बंधूंची शिक्षा आणखी वाढविण्याची मागणी केली.यापूर्वी, न्या. तीरथ सिंह ठाकूर आणि ज्ञान सुधा मिश्र (आता सेवानिवृत्त) यांच्या न्यायपीठाने 5 मार्च 2क्14 रोजी अन्सल बंधूंना दोषी ठरविले होते. तथापि, दोघांच्या शिक्षेबाबत न्यायधीशांत मतैक्य नव्हते. न्या. ठाकूर दिल्ली उच्च न्यायालयाने 2क्क्8 मध्ये दिलेल्या निर्णयाच्या बाजूने होते. उच्च न्यायालयाने अन्सल बंधूंना एक-एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती; परंतु न्या. मिश्र यांनी सुशील अन्सल यांच्या वयाचा विचार करून त्यांनी भोगलेल्या तुरुंगवासार्पयत शिक्षा मर्यादित केली होती. तथापि, गोपाल यांची शिक्षा वाढवून दोन वर्षे केली होती. त्यानंतर हे प्रकरण तीन सदस्यीय न्यायपीठाकडे निर्णयासाठी वर्ग करण्यात आले होते.बुधवारच्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी या अग्निकांडप्रकरणी दिल्ली विद्युत मंडळाच्या कर्मचा:यांवर आरोप केला. घटना घडली त्या दिवशी ट्रॉन्सफॉर्मरमध्ये किरकोळ आग लागली होती. दिल्ली विद्युत मंडळाने ही आग विझविण्यासाठी तज्ज्ञ न पाठविता साधा मिस्त्री पाठविला. दोषसिद्धीविरुद्ध तुम्ही युक्तिवाद करू शकत नाही. शिक्षेच्या कालावधीबाबतच तुमचे म्हणणो ऐकून घेतले जाईल. आव्हान द्यायचे असेल, तर फेरविचार याचिका दाखल करा, असे न्यायपीठाने जेठमलानी यांना सांगितले.दोषींची शिक्षा कमी करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने आव्हान देत अपील दाखल केले होते