शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

दापोलीला आणखी एक विद्यापीठ?

By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST

जागा देण्याची तयारी : मेरिटाईम युनिव्हर्सिटीसाठी १०० एकर जार्गा

दापोली : दापोलीत समुद्रानजीक १०० एकर सलग जागा उपलब्ध झाल्यास मेरिटाईम युनिव्हर्सिटी सुरू करण्याची केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या घोषणा केली. रामराजे महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी संदीप राजपुरे यांनी यासाठी १०० एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी अनंत गीते यांनी तत्वत: होकार दिला आहे. यामुळे लवकरच दापोलीला आणखी एक विद्यापीठ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.दापोली तालुक्यातील करंजाणी ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अनंत गीते यांनी चिपळूणला कागद कारखाना, गुहागरला आॅईल रिफायनरी व दापोली आणि मंडणगडकरिता मेरिटाईम युनिव्हर्सिटीची घोषणा केली. मात्र, मेरिटाईम युनिव्हर्सिटीकरीता समुद्राजवळ सुमारे १०० एकर जागा आवश्यक असल्याचे गीते यांनी सांगितले. यावेळी गीते म्हणाले की, लाडघर येथील ग्रामस्थांशी प्राथमिक बोलणे झाले. त्यावेळी ग्रामस्थ १०० एकर जागा विनामूल्य देण्यास तयार होते. मात्र, आता त्यांना या जागेचे मूल्य हवे असल्याचे ते म्हणाले. यासाठी कोणीही विनामूल्य जागा देण्याचे कबूल केले तरी शासकीय नियमाप्रमाणे त्यांना याचे मूल्य अदा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित असणाऱ्या संदीप राजपुरे यांनी कळंबट गावात मेरिटाईम युनिव्हर्सिटी होणार असल्यास आपण पुढाकार घेऊन १०० एकर जागा सदर कामाकरिता उपलब्ध करून देऊ, असे जाहीर केले. यावर दोन्ही गावांतील जागांची लवकरच तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात येईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे गीते यांनी सांगितले. यामुळे मेरिटाईम युनिव्हर्सिटीच्या जागेचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. (प्रतिनिधी)दापोलीत सध्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असून, तेथे हजारों विद्यार्थी विविध शाखांमध्ये कृषीचे शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाची मत्स्य शाखादेखील रत्नागिरीत आहे. विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी देखील जगभर प्रसिध्द आहे. दापोलीला लागून असणाऱ्या आपटी गावात येथील माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांचे होमिओपथिक मेडिकल कॉलेज आहे. दापोलीत रामराजे महाविद्यालयात नर्सिंग, जर्नालिझम, हॉटेल मॅनेजमेंट सारखे व्यवसाभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम शिकवले जातात. काही वर्षांपर्यंत तीन भारतरत्नांच्या या गावात विज्ञानाचे शिक्षण देण्याची असणारी वानवा संपुष्टात येऊन विद्यार्थ्यांचा शास्त्रज्ञ होण्याचा मार्गदेखील प्रशस्त झाला आहे. आता या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.