शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टीची आणखी एका विक्रमाला गवसणी!

By admin | Updated: October 8, 2015 06:30 IST

वय केवळ ११ वर्षे ! पण उमरेडच्या वेकोलि परिसरात राहणारी सृष्टी शर्मा या बालिकेने लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी बुधवारी यशस्वी प्रयत्न करीत

नागपूर : वय केवळ ११ वर्षे ! पण उमरेडच्या वेकोलि परिसरात राहणारी सृष्टी शर्मा या बालिकेने लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी बुधवारी यशस्वी प्रयत्न करीत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट स्कूल येथील स्केटिंग रिंकवर सृष्टीने १९ सेंटीमीटर उंचीच्या समांतर बारमधून २५ मीटर लांब अंतराचे अवघड आव्हान पूर्ण करताच उपस्थित शेकडो विद्यार्थी आणि गणमान्य नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सृष्टीच्या या विक्रमी कामगिरीचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. ही प्रतिभावान स्केटर इथेच थांबली नाही. काही वेळाच्या अंतराने सृष्टीने आधी १८ व त्यानंतर १७ सेंटीमीटर उंची यशस्वीरीत्या पूर्ण करीत लिम्बो स्केटिंगमध्ये नव्या अध्यायाची नोंद केली. लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडद्वारा सुरू असलेल्या ‘बेटी बचाव’ या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सेंटर पॉर्इंट स्कूलचे योगदानदेखील मोलाचे ठरले. ‘वंडर गर्ल स्केटर’ सृष्टीचा उत्साह वाढविण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा व इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)असा नोंदविला विक्रम!सृष्टीने सर्वप्रथम १९ सेंटीमीटरची उंची पूर्ण करताच मागचा २२.५ सेंटीमीटर उंचीचा रेकॉर्ड मोडीत निघाला. त्यानंतर ती १८ सेंटीमीटर उंचीच्या बारमधून २५ मीटर लांब अंतर गाठण्यात यशस्वी झाल्यानंतर १७ सेंटीमीटर उंचीच्या बारमधूनही अलगद बाहेर पडताच शाळेच्या परिसरात उत्साहाला उधाण आले होते. सृष्टीच्या यशाचे व्हीडिओ चित्रण आणि फोटो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. तिचा हा विक्रम प्रमाणित होताच सृष्टीला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

सृष्टीची कामगिरी गौरवास्पद : खा. दर्डाखा. विजय दर्डा म्हणाले, सृष्टीची कामगिरी आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या चिमुकल्या स्केटर्सकडून प्रेरणा घ्यावी. शालेय शिक्षणातही ती अव्वल असून परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवित सृष्टीने स्वत:ची योग्यता सिद्ध केली आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करण्याचे आवाहन दर्डा यांनी विद्यार्थ्यांना केले. सृष्टी वेकोलिची ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर : मिश्रासृष्टीच्या डोळे दीपविणाऱ्या कामगिरीने प्रभावित झालेले वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी आपल्या भाषणात सृष्टीला वेकोलिचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर बनविण्याची घोषणा केली.मला माझ्या कामगिरीचा आनंद आहे. आता माझे लक्ष्य ५० मीटर लिम्बो स्केटिंगचे असेल. यासाठी मी लवकरच तयारी सुरू करणार आहे.- सृष्टी शर्मा

मुलगी म्हणून मला सृष्टीवर गर्व वाटतो. सोबतच या मोहिमेत लोकमतच्या सहकार्याला सलाम करतो. आनंद व्यक्त करायला आज माझ्याकडे शब्द नाहीत.- धर्मेंद्र शर्मा, वडील