मुंबई : महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आदिवासी विकास खरेदीत घोटाळा केल्याच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ही फौजदारी जनहित याचिका असून, यात मुंडे यांनी केलेल्या तथकथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याआधी मुंडे यांच्याविरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. एका याचिकेत न्यायालयाने मुंडे यांच्यासह राज्य सरकारला याचे प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}