पुणे : पैसे हिसकावल्याच्या कारणावरून करण रंगीलाल वर्मा याचा खून करणाऱ्या आणखी एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे़ अभय संजय लांडगे (वय २०, रा़ किश्किंधानगर, कोथरूड) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी पोलिसांनी आशुतोष ऊर्फ सोनू अनिल पालके (वय १९, रा़ जयभवानी नगर, कोथरूड) आणि निखिल बाळासाहेब गोळे (वय २०, रा़ किश्किंधानगर, कोथरूड) यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत़ ही घटना १८ जुलै रोजी किश्किंधानगर येथे घडली. करण रंगीलाल वर्मा (वय २३, रा़ शुक्रवार पेठ) हा शनिपार येथील फर्निचरच्या दुकानात कामाला होता़ मंडईतील हॉटेल प्यासा येथे १८ जुलैला मध्यरात्री १ वाजता अभय लांडगे याने करण वर्मा याच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले होते़ त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला़ यावरून त्यांच्यात भांडण झाले होते़ त्यानंतर लांडगे, गोळे आणि पालके यांनी संगनमत करून करण याला मोटारसायकलवरून किश्किंधानगर येथील टेकडीवर नेले़ तेथे करण याला पट्ट्याच्या बेल्टने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला होता़ लांडगे याला गुरुवारी न्यायालयात हजर केले़प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे यांनी ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)>प्रत्यक्षदर्शी साक्षिदाराची माहितीगुन्ह्यानंतर त्या वेळी वापरलेले पालके व गोळे यांचे कपडे लांडगे याने स्वत:कडे घेतले होते, ते कपडे जप्त करायचे आहेत़ करण वर्मा याचा मोबाईल जप्त करायचा आहे़ गुन्हा मध्यरात्री घडला असल्याने चौकशी करून प्रत्यक्षदर्शी व साक्षीदारांची माहिती घ्यायची आहे़ यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सरकारी वकील एस़ सी़ शिंदे यांनी सांगितले़
कोथरूड खूनप्रकरणी आणखी एकाला अटक
By admin | Updated: August 5, 2016 01:02 IST