शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पाटोद्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 11, 2017 21:45 IST

विदर्भ मराठवाडा येथील शेतकरी आत्महत्येचे लोण आता येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पोहोचले आहे. येथील अमीर लतिफ चौधरी (५५) या

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 11 - विदर्भ मराठवाडा येथील शेतकरी आत्महत्येचे  लोण आता येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पोहोचले आहे. येथील अमीर लतिफ चौधरी (५५) या शेतकऱ्याने  नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली  जीवन यात्रा संपविली. शेतकरी आत्महत्येची  या परिसरातील आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने पाटोदा परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चौधरी यांनी आपल्या खिशात तशा प्रकारची चिट्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले. कर्जमाफीची घोषणा होण्याच्या काही काळ अगोदरच या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
 चौधरी यांनी आज दि 11  मे रोजी सायंकाळी चार पाच वाजेच्या सुमारास आपल्या शिरसगाव रोड वरील शेतात कांद्याच्या चाळीजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे चौधरी यांच्या नावावर दोन  पावणेदोन एकर च्या आसपास शेती असून शेतीसाठी त्यांनी पाटोदा सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नापिकी तसेच शेतीपिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. या वर्षात नवीन शेतीसाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे प्रपंच्याचा रोजचा खर्च कसा भागवायचा या वैफल्यग्रस्त मनस्थितीतून जीवनयात्रा संपविली .घटना स्थळी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार,उगलमुगले,विजय जाधव संजीवकुमार मोरे यांनी येवून पंचनामा केला.
 आत्महत्या करण्यापुर्वी चिट्ठीत लिहून ठेवलेला मजकूर
सोसायटी कर्ज , वीजबिल, घरखर्च यासाठी लोकांचे घेतलेले पैसे या वर्षी शेतीसाठी लागणारे भांडवल कसे करायचे अशा विचारांनी काहूर केले. शेतीमालाला नसलेला भाव , दोन वर्षापासून नापिकी, जगायचे कसे?  शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्यायाच नाही. माझ्या या निर्णयाला मी ठाम झालो. यामध्ये माझ्या कुटुंबातील अथवा नातलग किवा शेजारी पाजारी कुणाचाही दोष नाही. हा मी घेतलेला ठाम निर्णय आहे. माझ्या मृत्यूमुळे कुणालाही त्रास होऊ नये.