शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉम्बे प्रकरणी आणखी ८ अटकेत

By admin | Updated: March 21, 2017 06:42 IST

फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे शनिवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्याप्रकरणी सोमवारी आणखी आठजणांना अटक

मुंबई : फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे शनिवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्याप्रकरणी सोमवारी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. तर दगडफेकीत जखमी झालेल्या १५ पोलिसांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर ट्रॉम्बे परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. तर रविवारी पकडलेल्या १७ हल्लेखारांना २४ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून एकूण याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या २५ झाली आहे. त्यामध्ये एमआयएमचे नगरसेवक शहानवाज हुसेन यांचा समावेश आहे.एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट ट्रॉम्बे परिसरातील एका विकृत तरुणाने फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यामुळे संतप्त जमावाने त्याच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांवर दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. त्यामध्ये १५ पोलीस जखमी झाले होते. यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांच्या तीन वाहनांचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी रविवारी पहाटे पोलिसांनी नगरसेवक हुसेन यांच्यासह१७ जणांना अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या सीसीटिव्हीमध्ये आणखी आरोपींचे चेहरे कैद झाले होते. मात्र घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू ठेवला होता. त्यानसार सोमवारी सकाळी पोलिसांनी आणखी ८ जणांना अटक केली असून या हल्यातील अटक आरोपींची संख्या २५ झाली असल्याचे परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप म्हणाले. (प्रतिनिधी)