शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

मलकापूरच्या विकास आराखड्याचा नकाशा जाहीर

By admin | Updated: June 22, 2015 23:00 IST

२२ आरक्षणे कायम : हरकतींसाठी महिन्याची मुदत

कऱ्हाड : उन्हाळी पदार्थ घरोघरी बनविले जातात; पण याच उन्हाळी पदार्थांना व्यावसायिक जोड देण्याचे काम कऱ्हाडातील गीतांजली तारळेकर या गृहिणीने केले आहे. गीतांजली यांनी त्यांच्या राहत्या घरीच शेवयांसह अन्य उन्हाळी पदार्थ बनविण्याचा व्यवसाय सुरू केला असून, या पदार्थांना पुणे, मुंबईसह अन्य ‘मेट्रो सिटी’ची बाजारपेठ मिळाली आहे. शहरातील मंगळवार पेठेत वास्तव्यास असणाऱ्या गीतांजली तारळेकर या गृहिणीने उन्हाळी पदार्थ बनविण्याचा व त्याची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.प्रारंभी तारळेकर कुटुंबीय आसपासच किरकोळ किमतीत या पदार्थांची विक्री करीत होते. मात्र, कालांतराने या व्यवसायाला चालना मिळत गेली. तारळेकर यांनी बनविलेल्या शेवया, पापड, भातवडी, उडीद पापड आदींची शहरातील दुकानांमधून मागणी होऊ लागली. सध्या तर हे पदार्थ पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी या भागांतही विक्रीसाठी पाठविले जात आहेत. त्याला मागणीही जास्त आहे. वास्तविक, मार्च ते मे महिन्याअखेरीस प्रत्येक घरात उन्हाळी पदार्थ बनविले जातात. मात्र, तारळेकर यांच्या घरी वर्षातील नऊ महिने हे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असते. गीतांजली यांना त्यांची मुलगी सोनाली ही या कामात मदत करते. मशीनच्या साह्याने प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलो शेवया येथे तयार केल्या जातात. तसेच त्याचठिकाणी त्या वाळविल्या जातात. आपल्या या व्यवसायाबद्दल माहिती देताना गीतांजली तारळेकर म्हणाल्या, ‘सुरुवातीला शेवया आणि पापड बनविण्याचा हा व्यवसाय कितपत साथ देईल, याबाबत मी साशंक होते. मात्र, कुटुंबीयांच्या साथीमुळे या उन्हाळी पदार्थांना चांगली बाजारपेठ मिळाली. पावसाळ्यातील फक्त तीन महिने मी हा व्यवसाय बंद करते. एरव्ही नऊ महिने येथे आम्ही विविध पदार्थ बनविण्यात दिवस घालवतो. पदार्थ बनविण्यास सकाळी सुरुवात केली की रात्री दहा वाजेपर्यंत आमचे काम सुरूच असते.’ (प्रतिनिधी) शेवायांनाही विविध ‘फ्लेव्हर’...शेवयाला व्यावसायिक जोड मिळाल्यामुळे गीतांजली यांनी त्यामध्ये वेगवेगळे बदल केले आहेत. येथे शेवया बनविताना त्या प्रामुख्याने मँगो, पांढऱ्या व मॅगी या तीन प्रकारांत बनविल्या जातात. त्यामध्येही लहान, मध्यम व मोठी असे तीन प्रकार आहेत. ‘रमजान’मुळे शेवयांना मागणी वाढलीमुस्लीम बांधवांचा ‘रमजान’ महिना सध्या सुरू झाला आहे. या महिन्यात तीस दिवस मुस्लीमबांधव उपवास करतात. उपवासाची सांगता म्हणजेच ‘रमजान ईद.’ यादिवशी प्रत्येक मुस्लीम कुटुंबात शिरखुर्मा बनविला जातो. हा शिरखुर्मा बनविण्यासाठी अनेक मसाले वापरले जातात. या मसाल्यांबरोबरच शेवयांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तारळेकर यांनी बनविलेल्या शेवयांना त्यामुळे सध्या चांगली मागणी आहे.