शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर

By admin | Updated: July 20, 2016 00:36 IST

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अभ्यासक्रम मंगळवारी राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर

पुणे : विद्यार्थी व पालक प्रतीक्षेत असलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अभ्यासक्रम मंगळवारी राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आला. बदलत्या काळानुरूप विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही त्यादृष्टीने भर पडावी, अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता चौथी व सातवीऐवजी पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला पसंती देतात. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असतो. यावर्षी पहिल्यांदाच पाचवी व आठवीसाठी परीक्षा घेतली जाणार असल्याने सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र, शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचे अभ्यासक्रम जाहीर करण्यात आले. परीक्षेसाठी उपयुक्त मराठी माध्यमातील चार मार्गदर्शिकांचेही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आले आहे. या वेळी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमांतून होणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा विविध बदल करण्यात आले आहेत. पारंपरिक प्रश्नांना बगल देत आता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी, तर्कशास्त्र, व्यावहारिक ज्ञान, भाषेचा व्यवहारात उपयोग, इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे, साहित्याचे प्रकार किती, लेखक कोण, गणितामध्ये सूट (डिस्काउंट) म्हणजे काय, यांसह तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ई-मेल, एसएमएस, कमिशन अशा विविध संकल्पनांशी संबंधित प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शन पुस्तिका शिक्षक, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ मराठी भाषेतील मार्गदर्शिका उपलब्ध झाल्या आहेत. अन्य भाषांविषयांचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>प्रश्नांची काठिण्यपातळीसोप्या स्वरूपाचे प्रश्न - ३० टक्केमध्यम स्वरूपाचे प्रश्न - ४० टक्केकठीण स्वरूपाचे प्रश्न - ३० टक्केइयत्ता आठवीसाठीच्या दोन्ही पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांबाबत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.