राजेंद्र दर्डा, राजेश टोपे, मधुकर चव्हाण आक्रमक : पुढील बैठकीत निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : मराठवाडय़ात अतिशय कमी पाऊस झाला असून तेथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे व पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री मधुकर चव्हाण या मराठवाडय़ातील मंत्र्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. यावर, परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत त्या बाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
राज्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या 9 जिल्ह्यात 26 ते 5क्टक्के, रायगड, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 11 जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पाऊस झाला असून हिंगोलीमध्ये सर्वात कमी म्हणजे 25 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाडय़ातील जलसाठय़ांमध्ये केवळ 17 टक्के पाणी शिल्लक आहे, अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
यावर राजेंद्र दर्डा, राजेश टोपे, मधुकरराव चव्हाण या मंत्र्यांनी आक्रमक होत, मराठवाडय़ात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्याचा मुद्दा लावून धरला. ढगाळ वातावरण निर्माण होते पण पाऊसच पडत नाही. म्हणून कृत्रिम पावसाचाही विचार करावा, अशी मागणी समोर आली.अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ आणि नाशिक जिलच्या काही भागात परिस्थिती गंभीर आहे, याकडे अन्य काही मंत्र्यांनी लक्ष वेधले. मराठवाडय़ातील मंत्र्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले की, विविध विभागांकडून माहिती मागवावी आणि गरज भासल्यास मराठवाडय़ासह इतर काही जिलंत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत आणला जाईल. टंचाई निवारणार्थ अंमलात आणावयाच्या योजनांना शासनाने मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक जिलत 31 ऑगस्टर्पयत याआधीच मुदतवाढ दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)
पुणो : मोठय़ा प्रतिक्षेनंतर मराठवाडय़ात सक्रिय झालेला मान्सून न बरसताच गायब झाला आहे. गेल्या 2 दिवसांत मराठवाडय़ात अल्प पाऊस पडला. उर्वरित राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली. गेल्या 24 तासांत विदर्भातील सिंदखेडराजा येथे सर्वाधिक 19क् मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यात सगळीकडे पाऊस पडत असताना मराठवाडा मात्र कोरडाच आहे. मराठवाडय़ात मंगळवारी मान्सून सक्रिय झाल्याने पाऊस पडण्याची आशा बळावली होती. मात्र अवघ्या एका दिवसात या भागातून पाऊस गायब झाला आणि बुधवारीही काही मोजक्याच ठिकाणी हलका पाऊस झाला.
पुढील 48 तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
औरंगाबादसह मराठवाडय़ातील आठही जिलत आत्तार्पयत फक्त 25 ते 3क् टक्के एवढाच पाऊस झाला असून अनेक ठिकाणी खरीपाची पेरणीही झालेली नाही. जलसाठय़ात पुरेशी वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याचेही संकट निर्माण झाले आहे.
च्गेल्या 24 तासांत विदर्भात पावसाचे प्रमाण वाढल्याचे चित्र होते. तर घाटमाथ्यांवरही पावसाचे प्रमाणही घटले होते. कोयना घाटात सर्वाधिक 2क्क् मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ ताम्हिणी घाटात 13क्, शिरगाव घाटात 12क्, दावडी घाटात 11क्, अम्बोणो घाटात 9क्, भिरा, डुंगरवाडी घाटात 7क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
च्दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केल्याने या भागात विद्याथ्र्याना शिक्षण शुल्क माफ, कर्ज वसुलीला स्थगिती, पीककर्जाचे पुनर्वसन, वीज बिल माफ, शेतसारा वसुलीला स्थगिती अशा प्रकारचा दिलासा मिळू शकेल.