शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

करकरेंच्या तपासातील निष्कर्ष जाहीर करा

By admin | Updated: May 17, 2016 05:53 IST

तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत

मुंबई : तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारने अनेक तथ्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. हेमंत करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनमोहन सिंग यांनी वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवाणींच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबी अवगत केल्या होत्या. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे अडवाणी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत, याकडे मोहन प्रकाश यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आज करकरेंच्या तपासावर अयोग्य आक्षेप घेतले जात असताना अडवाणींनी मौन न बाळगता त्या वेळी त्यांच्यासमोर कोणते तथ्य आले होते, ते जाहीर करावे अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे, तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक भागवत यांच्या जिवालाही धोका असल्याचे करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सरसंघचालकांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवतांनी त्यांची करकरेंशी भेट झाली होती की नाही, ते जाहीर केले पाहिजे, अशीही मागणी मोहन प्रकाश यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)