शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

...तर केजरीवालांविरोधात धरणे आंदोलन करेन- अण्णा हजारे

By admin | Updated: May 9, 2017 17:52 IST

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास आंदोलन छेडण्याच्या इशारा दिला आहे. केजरीवालांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या राजीनाम्यासाठी मी धरणे आंदोलन करेन, असा इशारा अण्णा हजारेंनी दिला आहे. तसेच कपिल मिश्रा यांनी पदावरून हटवल्यानंतर केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, असंही अण्णांनी यावेळी सांगितलं आहे. अण्णा म्हणाले, पूर्व मंत्र्यांनी केजरीवालांच्या विरोधात जे काही सांगितलं आहे ते मंत्रिपदावरून हटवल्यानंतर सांगितलं आहे. मात्र ज्यावेळी पैशांची देवाणघेवाण झाली तेव्हा मिश्रा मंत्री होते. त्यांनी अधिका-यांना सावधान का नाही केलं, असा सवालही अण्णांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात पूर्ण चौकशी झाली पाहिजे. जर केजरीवाल दोषी आढळले, तर मी स्वतः जंतर मंतरवर धरणे आंदोलन करून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी करेन, असं अण्णा म्हणाले आहेत. तत्पूर्वी सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी दिले आणि हे मी स्वतः पाहिलं, अशा मिश्रांच्या आरोपांनंतर अण्णा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अण्णा म्हणाले, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अरविंद केजरीवाल नेहमीच पुढे असायचे, एकेकाळी केजरीवालांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. मात्र आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यानं खूप दुःख होतंय.(केजरीवालांनी माझं स्वप्न भंग केलं- अण्णा)केजरीवाल सरकारनं माझं स्वप्न आधीच भंग केलं आहे. या प्रकरणावर पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. टाइम्स नाऊला अण्णा म्हणाले, मी पूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेन आणि मगच त्यावर विस्तारानं चर्चा करेन, आता मी जे टीव्हीवर पाहतो आहे. त्या बातम्या पाहून मला खूप दुःख होतंय, आम्ही भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढतो आहोत. मी गेल्या 40 वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहे. दिल्लीत जी भ्रष्टाचार विरोधात लढाई झाली त्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री बनले. मात्र आज त्यांच्यावरच असे आरोप लागत असल्यानं ही खूपच दुःखदायक घटना आहे. मी आता त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. जेव्हा कॅबिनेटमधल्या 6 मंत्र्यांपैकी तिघांनी राजीनामा दिला, तेव्हाच माझं स्वप्न भंग झालं. कॅबिनेट मंत्री येऊन बोलतो की, मी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिले. ही खूपच दुःखाची गोष्ट आहे.किरण बेदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, एका मुख्यमंत्र्यांविरोधत एक मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप लावतो आहे. आणि साक्षीदार होण्याचा दावा करतो आहे. याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. एकंदरीतच केजरीवालांच्या पुढच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत.