शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अंधांच्या विश्वचषकमध्ये चमकला देउळघाटचा अनीस

By admin | Updated: February 13, 2017 22:39 IST

ट्वेंटी-20 विश्वचषकविजेत्या भारतीय संघात बुलडाणा जिल्हयातील देउळघाट येथील दृष्टीबाधीत खेळाडू अनीस फखरुल्लाह मिर्झा

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 13 -  भारताने अंधाच्या टी - २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले. या विजेत्या भारतीय संघात जिल्हयातील देउळघाट येथील दृष्टीबाधित खेळाडू अनीस फखरुल्लाह मिर्झा याचा समावेश आहे. अनीसने मिळविलेल्या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.रविवारी  बेंगलुरु येथे भारत-पाकिस्तान दरम्यान  टी- २० क्रिकेट विश्वचषकासाठी अंतिम सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवित विश्वचषक आपल्या नावे केले. या विश्वचषक सामन्यात खेळणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये अनीस फखरुल्लाह बेग याने चमकदार कामगिरी करीत आपली गुणवत्ता सिद्ध केली. शेवटच्या सामन्यात १९८ चे लक्ष्य तीन खेळाडूंनीच पूर्ण केले. त्यामुळे अनीसला फलंदाजीची संधी मिळाली नाही. या स्पर्धेत भारतासह,  पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेपाल, बांग्लादेश, आॅस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज व इंग्लडच्या संघाचा समावेश होता. या स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला नऊ सामने खेळण्याची संधी मिळाली. या ९ सामन्यातील आठ सामने भारतीय संघाने जिंकले.लोकल रेल्वेत विकतो साहित्य२८ वर्षीय अनीस बेगचे वडील फखरुल्लाह बेग हे व्यवसायाने ट्रकचालक आहेत. आर्थिक संकटामुळे वडीलांनी काही वर्षापूर्वी देउळघाट गाव सोडले व नाशिक येथे वास्तव्यास गेले. अनीसने कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात अनीस सध्या मुंबई परिसरातील अंबरनाथ येथे राहतो व रोजंदारी मिळविण्यासाठी तेथील लोकल रेल्वेमध्ये छोटे मोठे साहित्य विक्रीकरण्याचे काम करतो आहे.