शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गणपती न बसविता गणेशोत्सव साजरे करणारे अंगापूर

By admin | Updated: September 9, 2016 17:42 IST

सातारा जिल्ह्यातील अंगापूर तर्फ व अंगापूर वंदन ही शेजारी-शेजारी असणारी दोन गावे. जुळ्या भावंडांप्रमाणे जणू! दोन्ही गावांच्यामध्ये फक्त एक ओढा!

संदीप कणसे, ऑनलाइन लोकमत

अंगापूर, दि. ९ - सातारा जिल्ह्यातील अंगापूर तर्फ व अंगापूर वंदन ही शेजारी-शेजारी असणारी दोन गावे. जुळ्या भावंडांप्रमाणे जणू! दोन्ही गावांच्यामध्ये फक्त एक ओढा! दोन्ही गावांत गणपतीची प्राचीन मंदिरे. दोन्ही गावांची मिळून ८ हजार लोकसंख्या आहे, पण इथल्या एकाही घरात गणपती बसविला जात नाही, अथवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. मात्र दोन्ही गावांतील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नुकताच मोठ्या हर्षोल्हासात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.   हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय व पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात भद्रोत्सव साजरा झाला. ‘मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरया’ च्या जयघोषाने अंगापूरचा परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र, अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजे आगळावेगळा भद्रोत्सव साजरा होतो. भाद्रपद प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव अनेक दिवस चालतो. या निमित्ताने अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ या दोन्ही गावांमध्ये असणा-या प्राचीन गणपती मंदिरामध्ये धूप आरती, भजने, कीर्तने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. गणेश चतुर्थी व पंचमी हे दोन दिवस मुख्य उत्सवाचे असल्याने या काळात भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.   एका दिवसात अंगापूर, फडतरवाडी, लिंबाचीवाडी येथील युवकांनी अंदाजे ६० ते ६५ किलोमीटर अंतर अनवाणी पायांनी चालत (दोरा) प्रदक्षिणा पूर्ण करत परिसरातील दैवतांना जलाभिषेक केला.या प्रदक्षिणेत जवळपास ६५० ते ७०० युवक सहभागी झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. गणपतीचे उपासक यांनी प्रज्वलित भगतपात्र डोक्यावर घेऊन अंगापूर वदन व अंगापूर तर्फ या दोन गावांतून मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात ‘मोरया म्हणा दोरया’ च्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावर एकच गर्दी केली होती.   शेकडो वर्षांची परंपरा..

  या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तर नवसाला पावणारा गणपती म्हणून यांची सर्वदूर ओळख आहे. यामुळे महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या काना कोपºयातून भाविक, भक्त मोठ्या संख्येने दाखल होत असतात. तसेच  गावांतील नोकरी, व्यवसायासाठी बाहेर असणारे ग्रामस्थ, माहेरवाशीण  मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.