शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

तर अंगणवाडी कर्मचारी विधानसभेवर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:30 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी वाडा येथे मोर्चात बोलताना दिला.

वाडा : अंगणवाडी कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तातडीने सोडविले नाहीत तर येत्या हिवाळी अधिवेशनात लाखोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी धडक देतील असा गंभीर इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी वाडा येथे मोर्चात बोलताना दिला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी घरावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाला संबोधित करताना एम.ए. पाटील पुढे म्हणाले, की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग या तिघांशी निगडीत असून या तिन्ही मंत्र्यांनी एकत्रित येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढावा. अंगणवाडी लाभार्थीना दिवसाला ४ रूपये ९२ पैशाचा आहार शासन देत आहे. पंरतु हे पैसे फारच अल्प आहेत. आजच्या महागाईमध्ये ४ रूपये ९२ पैशांमध्ये लाभार्थीना खूप कमी आहार मिळतो. लाभार्थीना एकवेळचा तरी पोटभर आहार द्यावा तसेच आहारासाठी खर्च झालेले पैसे सहा सहा महिन्यात देण्याची पध्दत बंद करून प्रत्येक महिन्यात आहारासाठी खर्च झालेले पैसे त्या त्या बचतगटांना देण्यात यावेत यामुळे लाभार्थाच्या आहारामध्ये खंड पडणार नाही असे संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले. (वार्ताहर)कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले असून बालमृत्यू होत असून ते थांबविण्यासाठी शासनाने काय केले पाहिजे या व अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, उपाध्यक्षा मंगला सराफ, विनिता देशमुख यांच्यासह जिल्हयातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.