शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार!

By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यासाठी १७६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच तो मांडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यासाठी १७६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच तो मांडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या ८ मार्चला महिला दिनापूर्वी ही वाढ जाहीर होण्याची शक्यता. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्या मानाने त्यांना मिळणारे मानधन तोकडे असून ते वाढविण्याचा प्रस्ताव आपल्या विभागाने वित्त विभागाला दिला आहे. या कर्मचाऱ्यांना दिवाळीला भाऊबीज भेट यापुढे नियमितपणे दिली जाईल, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. मुनगंटीवार म्हणाले की, वित्त विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी देऊन तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. (विशेष प्रतिनिधी)