शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

...आणि वाहतूक व्यवस्थेला आली जाग

By admin | Updated: January 20, 2017 00:44 IST

बारामती शहरातील ६ ठिकाणी सिग्नल व्यवस्था उभारली आहे.

बारामती : बारामती शहरातील ६ ठिकाणी सिग्नल व्यवस्था उभारली आहे. मात्र, केवळ अपुऱ्या पोलीस बळामुळे अडचण होत आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूकव्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी ३५ पोलीस कर्मचारी व ३५ वॉर्डनची नव्याने नियुक्ती करावी, याबाबत बारामती नगरपालिकेत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यामध्ये मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सदर प्रस्ताव जिल्ह््याच्या पोलीस अधीक्षकांकडे पाठविला.‘लोकमत’ने बारामती शहरातील बंद सिग्नल यंत्रणा, विस्कळीत वाहतुकीबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी देशमुख यांची बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोर्ले यांच्यासमेवत बैठक घेण्यात आली. या वेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यासाठी नगर परिषदेमार्फत १५ वॉर्डन नेमण्यासाठी येणारा खर्च करण्यात यावा, वाहतूक नियमावली, साईन बोर्ड तसेच वाहतुकीची नियमावली व नियम समजण्यासाठी ट्रॅफिक गार्डन तयार करणे याबाबत सूचना केल्या होत्या. सर्वसाधारण सभेने वॉर्डनकरिता ३००० रुपये प्रतिवॉर्डन प्रमाणे १५ वॉर्डन नेमण्यास येणारा खर्च ४५ हजार रुपये पोलीस खात्याकडे वर्ग करण्यास, साईन बोर्ड तयार करण्यास, वाहतुकीची नियमावली व नियम समजण्यासाठी ट्रॅफिक गार्डनकरिता दीड ते दोन एकर जागा देण्यास तसेच भाडेतत्त्वावर क्रेन घेण्यास मंजुरी दिली. त्यामध्ये शहरातील ९ ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने व सिग्नल सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या वेळी सदर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकूण २५ पोलीस कर्मचारी व ३५ वॉर्डनची आवश्यकता आहे. ही नेमणूक केल्याशिवाय सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार नसल्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले.वाहतूक शाखेकरिता २ पोलस्ीा अधिकारी, ३५ पोलीस कर्मचारी व ३५ वॉर्डनची नेमणूक करणे गरजेचे आहे. १५ वॉर्डनकरिता येणारा खर्च नगर पारिषद देणार आहे. उर्वरित १० वॉर्डनकरिता येणारा खर्च नगरपालिका पोलीस खात्याकडे अदा करण्याबाबतची कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्याधिकारी देशमुख यांनी बैठकीत दिले. यासाठी वाढीव संख्याबळ उपलब्ध करून शहरातील नो पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी वाहने उचलण्यासाठी क्रेन उपलब्ध करावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला आहे.