शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि नेटकऱ्यांनी ‘त्यांना’ महाराष्ट्र दाखवला

By admin | Updated: October 6, 2014 05:33 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या मोदी लाटेने दिग्गजांचे पानिपत केले. आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यानही पूर्णपणे बहुमत हासील करण्यासाठी भाजपाने मोदी नावाचा चेहरा पुढे केला

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या मोदी लाटेने दिग्गजांचे पानिपत केले. आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यानही पूर्णपणे बहुमत हासील करण्यासाठी भाजपाने मोदी नावाचा चेहरा पुढे केला. त्यासाठी भाजपाने खेळी खेळून ‘आरं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या जाहिरातींचा फंडा पुढे केला खरा. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने त्यांचीच खेळी त्यांच्यावर पलटवत त्यांना महाराष्ट्राचे स्थान त्यांच्याच भाषेत दाखवून दिले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानी सभा आणि प्रचार-प्रसार रंगत असला तरी सोशल नेटवर्क साइट्सवर प्रचार-प्रसाराने भलताच वेग घेतला आहे. आता तर श्वासागणिक इथल्या प्रचाराचा फंडा बदलत असून, भाजपाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी छोट्या पडद्याहून ‘आरं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या जाहिरातींचा धुमाकूळ सुरू केला. छोट्या पडद्यावरील या जाहिरातींनी व्हॉॅट्सअ‍ॅपची जागा घेतली आणि नंतर मात्र या जाहिरातींची नेटकरांनी चांगलीच टर उडवणे सुरू केले. आता तर या फंड्याने कहर केला असून, नेटकरी त्या मेसेजने विटले आहेत. विशेषत: त्यांच्याच भाषेत नेटकऱ्यांनी त्यांना उत्तरे देण्यास सुरुवात केली असून, यातून महाराष्ट्राचे स्थान दाखवून दिले आहे.गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर... बुमरवर आता स्टीकर पण मिळत नाही - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; रोज डव्ह साबणाने आंघोळ करणारा अ‍ॅडमिन आज व्हिम बार साबणाने आंघोळ करतोय - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा़ आज मी लॅपटॉप सुरू करून गुगलवर महाराष्ट्र सर्च केलं, तर काय आश्चर्य... अहो, चक्क गुगल स्वत: वैतागून विचारत होता... अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; काल रात्रभर नीट झोपच नाही लागली, डोक्यात एकच विचार येत होता - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; अरे महाराष्ट्र म्हणजे काय काड्यांची पेटी आहे का - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा़ पूर्वी पोरं फोन फक्त बोलायला वापरायचे, आता ही पोरं अख्खा दिवस व्हॉट्सअ‍ॅपवर राज्याच्या नावाने गळे काढताहेत - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा़ वडापाववर समाधान माननारी गर्लफ्रेंड आता बर्गरशिवाय काय खात नाही - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे अनेक मेसेज फिरत आहेत. (प्रतिनिधी)