शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

...तर केरोसिन परवाने रद्द करण्यात येणार

By admin | Updated: May 19, 2016 05:57 IST

पाच वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून नूतनीकरण न झालेले घाऊक, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवाने आता रद्द करण्यात येणार आहेत.

मुंबई : पाच वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून नूतनीकरण न झालेले घाऊक, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवाने आता रद्द करण्यात येणार आहेत. या परवान्यांच्या नूतनीकरणाचे नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा विभागाने आज जारी केले. केरोसिन परवाना नूतनीकरण पद्धतीत आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. केरोसिन परवान्याची मुदत ज्या वर्षी समाप्त होत आहे त्या वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण न केलेल्या परवान्यावर १ जानेवारीपासून प्रत्यक्ष नूतनीकरण होईपर्यंत कोणताही केरोसिन कोटा देण्यात येणार नाही. केरोसिन परवाना नूतनीकरणास झालेल्या विलंबास शासकीय अधिकारी/कर्मचारी जबाबदार आढळल्यास तसेच परवाना नूतनीकरण केलेले नसतानाही त्यावर केरोसिन कोटा सुरू ठेवल्यास संबंधित अधिकारी/ कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. नूतनीकरणासतील विलंबास परवानाधारक जबाबदार असल्यास अनामत रक्कम जप्त करून तसेच दंडाची रक्कम आकारून पुन्हा नव्याने अनामत रक्कम आकारण्याची पद्धत आहे. या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, घाऊक परवानाधारकाकडून दरदिवशी ४०० रुपये दंड आकारला जाईल. किरकोळ व हॉकर्सच्या परवानाधारकांना दरदिवशी २० रुपये दंड लावला जाईल.राज्यात केरोसिनचे ५६ हजार ५३५ किरकोळ परवाने आहेत. घाऊक परवान्यांची संख्या ७८६ इतकी असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.