शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् घराची लॉटरी लागली

By admin | Updated: February 25, 2016 02:52 IST

म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार, ठाणे, मीरारोड आणि वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या वेळी अनेकांची घरांची वणवण

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार, ठाणे, मीरारोड आणि वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या वेळी अनेकांची घरांची वणवण थांबली असली, तरी अनेक अर्जदार नव्या स्वप्नांची गुंफण करण्यासाठी पुन्हा प्रयत्न इराद्याने सभागृहातून निघाले. त्या वेळी कोणाच्या चेहऱ्यावर हसू, तर काहींच्या चेहऱ्यावर आसू असे चित्र निर्माण झाले होते.आश्चर्याची बाब म्हणजे, सभागृहात उपस्थितांपैकी एकाही व्यक्तीला पहिल्या तासाभरात निघालेल्या सोडतीमध्ये घर लागले नव्हते. मात्र, त्यानंतर काढलेल्या मीरारोड येथील सोडतीमध्ये संतोष कांबळे (२७) आणि इक्बाल खान (२५) या सभागृहात उपस्थित तरुणांची नावे जाहीर झाली. या दोन्ही तरुणांनी स्वत:च्या नावाने प्रथमच अर्ज केला होता.या आधी मंगळवारी रात्रीपासूनच घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी रंगशारदा सभागृहाबाहेर मुक्काम ठोकला होता. त्यामुळे सकाळी आलेल्या अर्जदारांची त्यात भर पडल्याने, रांग सुमारे दोन किलोमीटर दूरवर गेली होती. स्थानिक पोलिसांमार्फत आॅनलाइन लॉटरी पाहण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत होते. मात्र, घराच्या आशेपोटी आलेले अर्जदार सभागृहाबाहेरील मंडपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.वणवण थांबली...!माझा सोडतीवर विश्वास नव्हता. अनेकांनी सोडतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अर्ज भरला. घर लागेल, अशी आशाही नव्हती. मात्र, नशिबाने साथ दिली आणि घर लागले. त्यामुळे सोडतीच्या पारदर्शकतेवर विश्वास बसला.- संतोष कांबळे,(विजेता अर्जदार)हक्काचे घर मिळालेएकत्रित कुटुंब असल्याने आजोबांसोबत मीरारोडला राहणाऱ्या घरातील जागा अपुरी पडत होती. म्हणून दुसऱ्या घराचा शोध सुरू होता. मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि घर लागले. आता आजोबांच्या मालकीव्यतिरिक्त हक्काचे स्वमालकीचे घर झाले आहे.- इक्बाल खान,(विजेता अर्जदार)आत्ता हप्त्याचे टेन्शनमुंबई महानगरपालिकेत कामाला असल्याने परळ गावातील पाणीखात्याच्या वसाहतीमध्ये राहत आहे. मार्च २०१७ मध्ये निवृत्त होत असल्याने, डिसेंबर २०१६ मध्ये घर खाली करावे लागणार होते. मात्र, २२ लाख रुपये कुठून आणायचे, याचे टेन्शन आहे.- काशिराम कदम,(विजेता अर्जदार)