शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...तर केंद्रीय आरोग्य सचिवांनी हजर व्हावे

By admin | Updated: February 5, 2017 17:06 IST

केंद्रीय आरोग्य योजनेंतर्गतच्या पॅनलमध्ये चंद्रपूर येथील रुग्णालयाचा समावेश करण्यावर येत्या २ मार्चपर्यंत निर्णय घेण्यात अपयश आल्यास ...

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 5 - केंद्रीय आरोग्य योजनेंतर्गतच्या पॅनलमध्ये चंद्रपूर येथील रुग्णालयाचा समावेश करण्यावर येत्या २ मार्चपर्यंत निर्णय घेण्यात अपयश आल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांनी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित राहावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.यासंदर्भात सोशल फोरम फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स कम सिनियर सिटीझनचे सचिव दौलत बेले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य योजनेंतर्गतच्या पॅनलमध्ये चंद्रपूर येथील रुग्णालयाचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर केंद्र शासनाने गेल्या ३ महिन्यांपासून निर्णय घेतला नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. परिणामी न्यायालयाने संतप्त होऊन केंद्र शासनाला या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी अंतिम संधी म्हणून २ मार्चपर्यंत वेळ वाढवून दिला. तसेच, या कालावधीत प्रकरणावर निर्णय घेण्यात अपयश आल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिवांनी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित होऊन आदेशाच्या अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये यावर स्पष्टीकरण सादर करावे असे सांगितले.केंद्रीय आरोग्य योजनेंतर्गतच्या पॅनलमध्ये चंद्रपूर येथील एकही रुग्णालय नाही. परिणामी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र शासनातर्फे त्यांचे वर्तमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येते. त्यासाठी शासनाने विविध खासगी रुग्णालयांसोबत करार केले आहेत. केंद्रीय आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विशिष्ट रक्कम कपात केली जाते. सेवानिवृत्तीनंतर सेवा सुरू ठेवायची असल्यास वेतनश्रेणीनुसार एकाचवेळी ४० ते ६० हजार रुपये जमा करावे लागतात. चंद्रपुरात आयुध निर्माणी, टपाल, टेलिफोन एक्सचेंज, सेंट्रल एक्साईज अशी विविध केंद्रीय कार्यालये आहेत. २००६ मधील सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १० हजार वर्तमान व सेवानिवृत्त कर्मचारी होते. आज ही संख्या ३० हजारावर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य योजनेंतर्गतच्या पॅनलमध्ये चंद्रपूर येथील रुग्णालयाचा समावेश करण्याची मागणी गेल्या १० वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु, त्यावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. ही मागणी पूर्ण झाल्यास चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचीही सुविधा होईल, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश मेघे यांनी बाजू मांडली.