शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्राचीन श्रीगणेश श्रद्धास्थाने

By admin | Updated: September 5, 2016 03:02 IST

छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे अशा श्रद्धेय राजांच्या राजवटीच्या रायगड जिल्ह्यात प्राचीन मंदिरांची परंपरा नसली तरच आश्चर्य.

जयंत धुळप,

अलिबाग- छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे अशा श्रद्धेय राजांच्या राजवटीच्या रायगड जिल्ह्यात प्राचीन मंदिरांची परंपरा नसली तरच आश्चर्य. विविध जाती-धर्मांच्या मंदिरांना आणि प्रार्थनास्थळांचा या राजांनी सातत्याने सन्मानच केला. परिणामी परप्रांतातील अनेक भक्तगण, स्वामी यांचे प्राचीन काळात पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यात आगमन मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यातूनच विविध श्रद्धास्थळांची निर्मिती झाली तर मुळातच अस्तित्वात असलेल्या स्वयंभू देवस्थानांना साक्षात्कारातून ऊर्जितावस्था प्राप्त झाली. अशाच प्राचीन श्रद्धेय श्रीगणेशस्थानांची मोठी मालिकाच रायगड जिल्ह्यात आहे. सुप्रसिध्द अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर, पाली आणि श्री वरद विनायक, महड या दोन सुपरिचित स्थानांचा तर सर्वांनाच परिचय आहे. परंतु त्या पलीकडे जिल्ह्यात थोड्या आडबाजूला असलेल्या श्रीगणेश श्रद्धास्थानांचा हा परिचय.>अलिबाग : श्रीरामसिद्धिविनायकअलिबाग-रेवस मार्गावर चोंढीजवळच्या मापगाव गावाजवळच्या कनकेश्वर या श्री शंकराच्या स्वयंभू गिरिस्थानीच श्रीरामसिद्धिविनायकाचे हे सुमारे अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीचे प्राचीन स्थान आहे. परशुरामाने दिलेली मूर्ती साडेसहा इंच रुंद व सव्वातीन इंच जाड असून पावणेपाच इंच उंचीची आहे. ती तांब्याच्या पेटीत बंद केली व त्याची प्रतिकृती भक्तांच्या दर्शनासाठी बाजूला ठेवली. आता या मंदिरातील मूर्ती ही मैराळ यांनी आणून दिलेली असून त्याच्याबाजूला साधारण अडीच फूट उंचीची रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. कणकेश्वरच्या टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ७५० पायऱ्या चढून जावे लागते. तेथे कणकेश्वर म्हणजे शंकराच्या मंदिराशेजारी उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुख मंदिर आहे.>कर्जत : दिगंबर सिद्धिविनायककर्जत तालुक्यातील कडाव येथील दिगंबर सिध्दिविनायकाची मूळ स्थापना कण्व ऋषींनी केल्याची आख्यायिका आहे. परंतु सुमारे ३५० वर्षांपूर्वी कडाव गावचे पाटील धुळे यांना ही मूर्ती शेतात नांगरणी करीत असताना मिळाली. दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला श्री जन्मदिनी पालखीपुढे धुळे कुटुंबातील काठी मिरविली जाते. त्याचबरोबर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला धुळे कुटुंबात पार्थिव गणेशमूर्ती आणली जात नाही. दिगंबर सिध्दिविनायकाचे हे स्थान अत्यंत जागृत मानले जाते. हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांनी मदत केली असल्याचे त्यांच्या दप्तरी नोंद आहे. >उरण : विनायकस्थ सिद्धिविनायकहंबीरराज नावाच्या राजाच्या काळातील सुमारे ८०० वर्षांचे प्राचीन विनायकस्थ सिद्धिविनायक स्थान उरण तालुक्यातील विनायक या गावात आहे. या गणपतीमुळेच या गावाला विनायक हे नाव पडले आहे. मूर्तीच्या मागील बाजूस संस्कृत शिलालेख आहे. थोरले माधवराव पेशवेही येथे आले होते, त्यांनी एक एकर जमीन मंदिरासाठी दिली होती. मंदिर चिरेबंदी असून चौरस दुमजली सभामंडप, चौकोनी गाभारा, गाभाऱ्याच्या भिंतीवर कमळ, स्वस्तिक कोरलेले आहे. मंदिरासमोर हनुमानाचे मंदिर असून गणेशमूर्तीच्या मागे उभे राहिले असता तेथून हनुमानाचे मुख दिसते. विनायकाची ही मूर्ती पाषाणात कोरलेली आहे. सुमारे पाच फूट उंच व तीन ते साडेतीन फूट रूंद अशी ही मूर्ती आहे.