शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आनंदवन कायम विस्मरणात

By admin | Updated: November 11, 2016 02:14 IST

बाबांच्या स्वप्नांना अनुसरून आनंदवनतर्फे पहिली ग्रंथदिंडी काढण्यात आली. सुुरुवातीला या उपक्रमाची थट्टा करण्यात आली.

पुणे : बाबांच्या स्वप्नांना अनुसरून आनंदवनतर्फे पहिली ग्रंथदिंडी काढण्यात आली. सुुरुवातीला या उपक्रमाची थट्टा करण्यात आली. त्यानंतर मराठी साहित्य संमेलनांमध्ये आवर्जून ग्रंथदिंडीच्या उपक्रमाची नक्कल करण्यात आली; मात्र, आनंदवनाचे स्मरण ठेवण्यात येत नाही, अशी खंत आनंदवनचे प्रमुख डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.अक्षरधारा आणि राजहंस प्रकाशनतर्फे आयोजित ‘दीपावली शब्दोत्सव’निमित्त पुस्तकदान महोत्सवात डॉ. आमटे यांनी गुरुवारी वाचकांशी संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद कुलकर्णी, मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह अनिल कुलकर्णी, नृसिंह मांडके, डॉ. प्रदीप लोखंडे उपस्थित होते. आमटे म्हणाले, ‘‘पु. ल. देशपांडे, विश्राम बेडेकर, गो. नी. दांडेकर, आचार्य अत्रे अशा दिग्गजांनी आनंदवनावर भरभरुन प्रेम केले आणि आम्हाला उभारी दिली. आनंदवनाला या सारस्वतांच्या मांदियाळीने नियमित भेट दिली. मराठी माणसाची मानसिकता बदलण्याचे मोठे काम यांनी केले. त्यामुळेच मी लेखन वाचले नाही; मात्र, माणसे वाचली. साहित्याच्या या अद्भूत दुनियेत सफर करण्यासाठी मला वाचक म्हणून पुनर्जन्म मिळावा, हीच इच्छा आहे.’’आनंदवनाविषयी ते म्हणाले, ‘‘आनंदवनातील लोकांनी उणिवांवर मात करत जीवनात भरभरुन यश मिळवले. देशातला सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प येथे उभा राहिला आहे. थेराप्युटिक थेरपीचा प्रयोग येथे यशस्वी होत आहे. दुर्दम्य आशावादाच्या बळावर येथील लोक जीवन आनंददायी करत आहेत. आनंदवनात अनेक जण अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांनाही वाचनाची ऊर्मी आहे. मात्र, वाचन करणे शक्य होत नाही. गो. नी. दांडेकर यांनी त्यांच्यासाठी वाचन करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, त्यांची गादी पुढे कोणीही चालवली नाही.’’पुस्तकदान उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ५००० पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. डॉ. प्रदीप लोखंडे यांनी ‘ग्यान की चळवळ’ या उपक्रमाची माहिती दिली. विश्वास मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले.