शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

सातारकरांकडून अमिताभ बच्चन आमंत्रित!

By admin | Updated: November 23, 2015 00:32 IST

मानाचा पुरस्कार : राज घराण्याने पाठविलेल्या कंदी पेढ्यांचा कौतुकाने स्वीकार

जगदीश कोष्टी- सातारा रुपेरी पडद्यावरचा महानायक अमिताभ बच्चन यांना एक मानाचा पुरस्कार स्वीकारण्याचे आमंत्रण सातारकरांनी दिले आहे. हे निमंत्रण सातारी कंदी पेढ्यासह ‘बिग बी’ला पोहोचले आहे. जगाला वेड लावणाऱ्या कंदी पेढ्यांचा बच्चन यांनी कौतुकाने स्वीकार केला आहे. या पुरस्काराच्या नावाची राजघराण्यातर्फे लवकरच घोषणा केली जाणार आहे.सातारा येथील पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमी आणि उदयनराजे भोसले फाउंडेशन आॅफ कल्चलर अ‍ॅक्टिव्हिटी यांच्या वतीने गेली पाच वर्षांपासून ‘सातारा गौरव’ पुरस्कार प्रदान केला जातो. छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे यंदा एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार रुपेरी पडद्यावरचा महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत अमिताभ बच्चन यांना निमंत्रण दिले आहे. हा सोहळा फेबु्रवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.या संदर्भात अमिताभ बच्चन यांना पंकज चव्हाण आणि भाग्यश्री ढाणे यांनी सातारकरांचे आग्रहाचे निमंत्रण दिले. यावेळी बच्चन यांनी सातारा शहर आणि येथील राजघराण्याबाबत आदर असल्याचे आवर्जून सांगितले. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी चव्हाण यांच्यासमवेत राजघराण्याचे निमंत्रणपत्र, सुका मेवा आणि कंदी पेढे पाठविले होते. या सर्वांचा बच्चन यांनी स्वीकार केला. साक्षात बिगबी साताऱ्यात येणार असल्याने सातारकर खूष झाले आहेत.पुरस्काराला मानाचे स्थान--बाबासाहेब पुरंदरे यांना ‘शिवशाहीर’ पुरस्काराने सन्मानित केले होते. हीच परंपरा कायम ठेवत खासदार उदयनराजे भोसले यांनी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवरायांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या घराण्याकडून निमंत्रण मिळाले. याचा खूप आनंद वाटला. उदयनराजेंनाही मी ओळखतो, त्यांचेही कार्य खूप चांगले आहे.- अमिताभ बच्चन, महानायक