शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांच्या भेटीवरून भाजपा-सेनेत जुंपली

By admin | Updated: September 4, 2014 00:59 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्रीवर पाय ठेवू नये, याकरिता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी शहा यांना गळ घातली आहे.

संदीप प्रधान - मुंबई
विधानसभा निवडणुकीकरिता शिवसेनेने जागा वाढवून देण्याची तयारी दाखवल्याखेरीज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्रीवर पाय ठेवू नये, याकरिता महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी शहा यांना गळ घातली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने शहा यांच्या भेटीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत केंद्रात रालोआचे सरकार आहे, याची आठवण शहा यांना करून दिली आहे. 
भाजपाला 144 जागा हव्यात, अशी राज्यातील नेत्यांची मागणी आहे. शिवसेनेने अद्याप त्या मागणीवर प्रतिसाद दिलेला नाही. शिवसेनेने ही मागणी मान्य करून काही जागांबाबत चर्चा अडली, तर  अंतिम टप्प्यात एखाद-दुस:या जागेच्या देवाणघेवाणीकरिता शहा व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी राज्यातील भाजपा नेत्यांची इच्छा आहे.  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शहा यांची भेट घेतली व मुंबई भेटीत मातोश्री भेट टाळू नका, असा सल्ला दिला आहे. केंद्रातील सरकारला बहुमत मिळाले असले तरी सरकार रालोआचे असून मित्रपक्षांचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला राऊत यांनी दिल्याचे समजते. 
असा असेल कार्यक्रम 
अमित शहा यांचे सकाळी साडेनऊ वाजता मुंबई विमानतळावर जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी जातील. त्यानंतर ते पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पूनम महाजन यांच्या निवासस्थानी भोजन करणार आहेत. तेथून ते लालबाग-परळमधील गणपतीचे दर्शन घेऊन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी उशिरा लोढा फाऊंडेशनद्वारा आयोजित गणोश महोत्सवास तसेच तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनास भेट देऊन महाआरतीतही सहभागी होतील.
 
शहा भेटीवरून युतीमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर येण्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी टाळले. फडणवीस हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नागपूर येथे असल्याने हजर राहू शकले नाहीत, असा खुलासा भाजपने केला.
 
मौका सबको मिलता है
च्लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान असताना मुंबईत आले होते तेव्हा भाजपाच्या एका नेत्याने अडवाणी हे मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे एसएमएस पाठवले होते. 
च्लागलीच शिवसेनेने बाळासाहेब आता विश्रंती घेत असल्याने अडवाणी यांना भेटणार नाहीत, असे एसएमएस माध्यमांना पाठवून अडवाणी यांना भेटण्याचे टाळले होते. ही घटना आम्ही विसरलेलो नाही. 
च्मौका सबको मिलता है..आता आमची वेळ आली आहे, असे मत एका बडय़ा भाजपा नेत्याने व्यक्त केले. त्याचवेळी संपूर्ण मुंबईत शहा यांच्या स्वागताकरिता लागलेले ‘अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र  हे फलक हेही शिवसेना वतरुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.