शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

108 क्रमांकाची रुग्णवाहिका बनली ‘फिरते प्रसूतिगृह’!

By admin | Updated: March 23, 2017 03:12 IST

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू केली. ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत १४ लाख जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली. विशेषत: गरोदर महिलांसाठी १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी मदतीला धावून आल्याचे दिसते. गेल्या तीन वर्षांत १३ हजार महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गरोदर महिलांसाठी ही रुग्णवाहिका ‘प्रसूतिगृह’च बनली आहे. राज्यातील जनतेसाठी मोफत आपत्कालीन वैद्यकीय सुविधा देण्यासाठी १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली. रस्ते अपघातातील जखमी, विविध हल्ल्यांत जखमी होणे, हृदयविकार असणारे, आगीत जखमी होणे, विषबाधा अशा इत्यादी रुग्णांना जवळच्याच रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी पोहोचता यावे, हा उद्देश त्यामागे ठेवण्यात आला. सध्या १0८ क्रमांकाच्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून, यात ७0४ रुग्णवाहिका प्राथमिक वैद्यकीय सुविधा, तर २३३ रुग्णवाहिका या अत्याधुनिक व सुसज्ज अशा आहेत. ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येमागे १ रुग्णवाहिका, तर शहरी भागात दोन लाख लोकसंख्येमागे १ रुग्णवाहिका असे प्रमाण या रुग्णवाहिकेचे ठरवण्यात आले आहे. १0८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर, अवघ्या २0 मिनिटांत ही रुग्णवाहिका मदतीसाठी उपलब्ध होते. या रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करण्यासाठी आणि जवळच्याच रुग्णालयापर्यंत रुग्णांना नेण्यासाठी एक डॉक्टरही उपलब्ध करण्यात आला आहे. जानेवारी २0१४ ते फेब्रुवारी २0१७ पर्यंत या रुग्णवाहिकेने १४ लाख १0 हजार ७0९ जणांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, गरोदर महिलांना या रुग्णवाहिकेची चांगलीच मदत मिळाली आहे. जवळपास १३ हजार महिलांची प्रसूती या रुग्णवाहिकेतच झाली. त्याचप्रमाणे, प्रसूती वेदना होणाऱ्या ४ लाख ३६ हजार ५१२ महिलांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या संदर्भात डी. जी. जाधव (राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा-प्रकल्प संचालक) यांनी सांगितले की, १0८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मोठी मदत राज्यातील लोकांना होत आहे. खासकरून अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांना याची मदत मिळत आहे. (प्रतिनिधी)