शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 29, 2016 04:05 IST

मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला.

अंबरनाथ : मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. तेच धोरण अंबरनाथच्या कोकोळे येथील जीआयपी टँकमधील पाण्यासंदर्भात घेण्याची गरज आहे. हे पाणी रेल नीरच्या माध्यमातुन विकण्यापेक्षा ते पाणी अंबरनाथकरांना वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पाणी प्रश्नावर रेल्वेमंत्री ‘प्रभू’ यांची ‘कृपा’ होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मलंगगडाच्या डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाणी अडविण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वेच्या माध्यमातून १९१५ मध्ये जीआयपी टँक (धरण) बांधला. रोज चार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता या धरणाची आहे. या धरणातून पूर्वी कल्याण रेल्वे स्थानक आणि रेल्वे संकुलाला पाणी पुरवठा केला जात होता. मात्र १९९७ मध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला. तेव्हापासून हे धरण वापरण्यात येत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने या धरणाच्या पाण्याचा वापर करुन रेल नीर हा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला. मात्र या ठिकाणचे पाणी या प्रकल्पासाठी कमी प्रमाणात वापरण्यात येते. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शुध्द झाले तरी दुर्गंधी कशी घालविणार हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येते. त्यामुळे या धरणाचा वापर अंबरनाथसाठी करणे शक्य आहे. हे धरण रेल्वेने पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिल्यास या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शहराला पुरविणे शक्य होणार आहे. अस्तित्वातील पाण्याचे स्त्रोत नागरिकांची तहान भागविण्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या धरणातील पाणी अंबरनाथला देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)