शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

By admin | Updated: January 20, 2017 02:34 IST

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. खुप संयम पाळला आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला असून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजीत केली आहे. ऐरोलीमध्ये आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहळ यांच्या निवासस्थानी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये धार्मीक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईची माहीती यावेळी आठवले यांना देण्यात आली. अडथळा होत नसलेल्या बुद्धविहारांवरही कारवाई केली जात आहे. महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंबेडकर स्मारकाचे काम सुरू केले आहे. पण जवळपास ८ महिन्यांपासून बांधकाम ठप्प आहे. पालीका सभागृहाने डोमला मार्बल अच्छादन लावण्याचा ठराव मंजूर केला होता. पण आयआयटीने दिलेला अहवाल व आर्थीक बचतीचे कारण देवून मार्बल न लावण्याचा निर्णय घेतला. नागरीकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर व पालिकेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतरही मार्बल न लावण्यावर प्रशासन ठाम असून सर्व काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आठवले यांनीही बांधकाम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबेडकरी जनतेच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. काम रखडले असेल तर तुम्ही काय करताय. लोकांना एकत्रीत करा व आवाज उठवा असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. आठवले यांना भेटण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, महेश खरे, युवराज मोरे, परमेश्वर गायकवाड, विजय कांबळे, शिला बोधडे व २०० ते ३०० पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत आम्ही खुप संयम ठेवला. शासनाने मुंबईतील इंदू मिलमध्ये स्मारकाचे भुमीपुजन केले पण प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. नवी मुंबईमध्ये महापालिकेने स्मारक उभारण्यास सुरवात केली आहे. काम अंतिम टप्प्यात असताना डोमला मार्बल बसविण्यावरून त्याला आक्षेप घेण्यात आला व काम थांबविले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.>नवी मुंबईमधील धार्मीक स्थळांवरील कारवाई व रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. निवेदन व विनंती करूनही स्मारकाचे काम पुर्ण होत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये याविषयी अंतीम निर्णय घेण्यात येईल. - सिद्राम ओहोळजिल्हा अध्यक्ष आरपीआय