लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईस घागरा-चोली नेसविणाऱ्या व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे, असे साकडे सर्वपक्षीय भक्तांनी रविवारी सकाळी अंबाबाई मंदिरात घातले.मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्वाभिमान’ संघटनेच्या सचिन तोडकरसह पाच जणांना पोलिसांनी रोखले. आंदोलकांनी मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली. मागील शुक्रवारी पुजारी बाबुराव व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता, भाविकाने दिलेली घागरा- चोली नेसविली. त्यानंतर, जनक्षोभ व्यक्त झाला. त्यात श्रीपूजकांनी मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड आणि ‘तथाकथित’ भाषेत राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकमाचाही अवमान केला. सर्वपक्षीय भक्तांनी आंदोलन केले.
अंबाबाईला सर्वपक्षीय भक्तांकडून साकडे!
By admin | Updated: June 19, 2017 01:34 IST