शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित

By admin | Updated: July 13, 2016 23:18 IST

राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम

- अझहर शेख

नाशिक : राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम कंपनीचे (बीएसएनएल) पोस्टपेड, प्रीपेड मोबाइल सीमकार्ड घेतले; मात्र महाराष्ट्र सीमा ओलांडल्यानंतर कुठल्याही प्रकारची रोमिंग सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने यात्रेकरूंची मोठी गैरसोय होत आहे.अमरनाथ यात्रेसाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने यात्रेक रू गेले आहेत. शनिवारपासून (दि.१३) काश्मीर खोरे धगधगत असून, श्रीनगरपासून तर थेट बालटालपर्यंत निदर्शने आणि जाळपोळ फुटीरवाद्यांकडून केली जात आहे. त्यामुळे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या वणवा पेटला आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी कमांडर बुरहान वाणीला सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे पेटले आहे. फुटीरवाद्यांनी सैन्य, पोलीस, यात्रेकरूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे अमरनाथ यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत बीएसएनलचे सीमकार्ड ‘नो-नेटवर्क’ दाखवित असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातून गेलेल्या यात्रेकरूंचा संपर्क त्यांच्या नातेवाईक-मित्र परिवारापासून तुटला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय सैन्याने जम्मू येथून काश्मीर, श्रीनगरकडे यात्रेकरूंना जाण्यास सध्या मज्जाव केला आहे. अमरनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या सीमकार्डला कुठल्याही प्रकारची रेंज मिळत नसल्याने यात्रेकरू चिंताग्रस्त झाले आहेत. काश्मीर खोऱ्याच्या बातम्यांनी नातेवाईक चिंतेत असताना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधता येत नसल्याने यात्रेकरू हतबल झाले आहेत. कटराच्या केंद्रात धावसीमकार्ड घेताना राष्ट्रीय रोमिंग नोंदवूनही बीएसएनएलकडून संगणकीय सर्व्हरमध्ये मात्र सीमकार्ड क्रमांकावर राष्ट्रीय रोमिंग सुविधा सुरू केली जात नसल्याने यात्रेकरूंची गैरसोय होत आहे. बहुतांश यात्रक रूंनी कटरा येथील भारत संचार निगमच्या कार्यालयात धाव घेऊन तक्रार केली; मात्र सीमकार्ड महाराष्ट्राचे असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनीही असमर्थता दर्शविली. यात्रेकरूंनी तेथील दूरध्वनीवरून मित्र व नातेवाइकांशी संपर्क साधत स्थानिक केंद्रात रोमिंग सुविधेबाबत तक्रार देण्यास सांगितले.महाराष्ट्र ओलांडल्यानंतर नेटवर्क गेले. जम्मूमध्ये पोहचल्यावरही रेंज मिळत नव्हती. नातेवाइकांशी संपर्क साधता येत नव्हता. पोस्टपेड सीम खास यात्रेसाठी घेतला आहे. अखेर कटरा येथील केंद्रातून नातेवाइकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून शहरातल्या केंद्रात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर राष्ट्रीय रोमिंगची सुविधा सुरू झाली अन् मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाच दिवसांनंतर वृद्ध आई-वडिलांशी बोलले आणि दिलासा दिला. - अमी पजवानी, यात्रेकरू, नाशिक