शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

अलॉय व्हिलमुळे बुडतेय आऊट काढणाऱ्यांची रोजी-रोटी

By admin | Updated: October 17, 2016 19:52 IST

नव्या तंत्रज्ञानाने पारंपरिक व्यवसायांवर गंडांतर येत असल्याची खंत अकोल्यात स्पोक रिंगचे आऊट काढण्याचे काम करणार्‍या मो. सिद्धीक मो. हनिफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

अतुल जयस्वाल

अकोला, दि. १७  : काळाचे चक्र गतीमान असते, बदलत्या काळासोबत सर्वच गोष्टी बदलतात. यांत्रिक युगात वाहन क्षेत्रात मोठी क्रांती झाली असून, आज घरोघरी दुचाकी, चारचाकी दिसून येतात. काळानूसार वाहनांमध्येही बदल होत आहेत. दुचाकीच्या स्पोक असलेल्या रिंग आता कालबाहय़ झाल्या असून, त्यांची जागा अलॉय व्हिलने घेतली आहे. या बदलामुळे मात्र पूर्वी स्पोक रिंगचे आऊट काढणार्‍या कारागिरांची रोजी-रोटी बुडत असल्याचे चित्र आहे. नव्या तंत्रज्ञानाने पारंपरिक व्यवसायांवर गंडांतर येत असल्याची खंत अकोल्यात स्पोक रिंगचे आऊट काढण्याचे काम करणार्‍या मो. सिद्धीक मो. हनिफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. शहरात सध्या मो. हनिफ यांच्यासह तीनच कारागिर हे काम करतात.

अकोल्यातील नुक्कड कचोरी कॉर्नर प्रसिद्ध आहे. आकोट स्टँड चौकात असलेल्या या नुक्कड कचोरी लगतच्या कोपर्‍यातच मो. सिद्धीक यांचे दुचाकींच्या स्पोक रिंगचे आऊट काढण्याचे छोटेसे दुकान आहे. सध्या ५५ वर्षांचे असलेले मो. हनिफ यांनी १९७८ मध्ये त्यांचे वडील मो. हनिफ यांच्याकडून वारसा घेतला. मो. हनिफ यांनी १९५१ मध्ये हे काम सुरु केले होते. तेव्हापासून या चौकात हे दुकान आहे. शहरच नव्हे, तर जिल्हाभरातून त्यांच्याकडे दुचाकीच्या रिंगचे आऊट काढण्यासाठी येणार्‍यांची गर्दी वाढू लागली. एवढेच नव्हे, तर दुचाकींच्या शोरुमधूनही त्यांच्याकडे दुचाकी येतात. या कामात त्यांचा मुलगा मो. आबीद हा देखील मदत करतो. काळाचे चक्र फिरले व दुचाकींच्या स्पोक रिंगची जागा आता अलॉय व्हील ने घेतली.

यामुळे हळूहळू त्यांच्या या व्यवसायाला उतरती कळा लागली. पूर्वी दिवसाकाठी १५ ते २0 रिंगचे काम करणार्‍या हनिफ यांच्याकडे आता दिवसातून मोठय़ा मुश्किलने ५ ते ६ रिंगचे काम येते. यामुळे सहा जणांचे कुटुंब चालविणार्‍या मो. हनिफ यांची आर्थिक ओढ-तान होत आहे. आता सर्वच दुचाकींना अलॉय व्हील असले, तर बुलेट या दुचाकीला अजूनही स्पोक रिंग आहेत. त्यामुळे प्रामुख्याने या दुचाकीच्या रिंग आऊट काढण्यासाठी येत असल्याचे मो. हनिफ यांनी सांगितले. आऊट चे दोन प्रकारदुचाकीची रिंग हे स्टेनलेस स्टीलची असून, त्यामध्ये ३६ स्पोक्स असतात. खड्डय़ांमुळे या रिंगचा आकार बदलतो. रिंग वरच्या बाजूने दबल्यास त्याला खडा आऊट, तर बाजून दबाल्यास त्याना आडा आऊट असे म्हटल्या जाते